२ शमुवेल 23:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तेव्हा आपला हात थकून तलवारीस चिकटेपर्यंत एलाजार पलिष्ट्यांना मार देत राहिला. त्या दिवशी परमेश्वराने मोठा विजय घडवून आणला, त्याच्यामागून लोक गेले ते केवळ लुटालूट करायला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 थकून अंगात त्राण राहिला नाही तोपर्यंत एलाजार पलिष्ट्यांशी लढत राहिला. तलवारीला हात चिकटेपर्यंत त्याने लढा चालू ठेवला. परमेश्वराने त्या दिवशी मोठा विजय घडवून आणला. एलाजारची युध्दात सरशी झाल्यावर मग शत्रू सैनिकांच्या मृतदेहावरच्या वस्तू गोळा करायला तेवढे ते लोक तिथे आले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 परंतु एलअज़ार युद्धभूमीवर राहून, त्याचा हात थकेपर्यंत व तलवारीला त्याचा हात चिकटून जाईपर्यंत त्याने पलिष्ट्यांना ठार मारले होते. त्या दिवशी याहवेहने त्यांना मोठा विजय प्राप्त करून दिला. सैन्य पुन्हा एलअज़ारकडे आले ते केवळ मेलेल्यांना लुटायला. Faic an caibideil |
ख्रिस्ताने माझ्या हातून न घडवलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, देवाच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जे जे घडवले तेच मी सांगतो; ते हे की, यरुशलेमेपासून सभोवती इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची सुवार्ता पूर्णपणे सांगितली आहे.