Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 22:44 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

44 माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; मी राष्ट्रांचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

44 माझ्यावर जे चाल करून आले त्यांच्यापासून तू मला संरक्षण दिलेस. त्यांच्यावर राज्यकर्ता म्हणून मला नेमलेस. ज्यांना मी कधी बघितले नव्हते ती राष्ट्रे माझे दास झाली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

44 “लोकांच्या हल्ल्यापासून तुम्ही माझी सुटका केली; राष्ट्रांचा प्रमुख म्हणून तुम्ही मला राखून ठेवले. ज्या लोकांची मला ओळख नव्हती ते आता माझी सेवा करतात,

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 22:44
26 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारे त्याने यहूदाच्या लोकांना एकदिल करून त्यांची मने वळवली; त्यांनी राजाकडे सांगून पाठवले की, “आपण आपले सर्व सेवक घेऊन माघारी या.”’


इस्राएलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता; ते म्हणू लागले की, “राजाने आम्हांला आमच्या शत्रूंच्या हातातून सोडवले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला; पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे.


मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेर्‍यांकडे गेले. आणि यवाब यरुशलेमेस राजाकडे परत गेला.


शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये फार दिवस युद्ध चालू राहिले; दावीद प्रबल होत गेला व शौलाचे घराणे निर्बल होत गेले.


मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत,


तो राष्ट्रांमध्ये न्यायनिवाडा करील; रणभूमी प्रेतांनी भरील; चोहोकडे मस्तके फोडील.


लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.


माझ्याजवळ माग म्हणजे मी तुला राष्ट्रे वतनादाखल देईन, पृथ्वीच्या दिगंतापर्यंतचे स्वामित्व तुला देईन;


पाहा, मी त्याला राष्ट्रांचा साक्षी, राष्ट्रांचा नेता व शास्ता नेमले आहे


पाहा, तू ओळखत नाहीस अशा राष्ट्रांना तू बोलावशील; ज्या राष्ट्राला तुझी ओळख नाही ते तुझ्याकडे धाव घेईल; ज्याने तुला वैभवयुक्त केले तो परमेश्वर तुझा देव, इस्राएलाचा पवित्र प्रभू ह्याच्यामुळे असे होईल.


कारण जे राष्ट्र व जे राज्य तुझी सेवा करणार नाही ते विलयास जाईल; अशी राष्ट्रे खातरीने उद्ध्वस्त होतील.


“जे मला विचारत नसत त्यांना मी दर्शन दिले; माझा धावा करत नसत त्यांना मी प्राप्त झालो. ज्यांना माझे नाम प्राप्त झालेले नव्हते त्यांना मी म्हणालो, ‘पाहा मी आहे, हा मी आहे.’


सर्व लोक, सर्व राष्ट्रे व सर्व भाषा बोलणारे लोक, ह्यांनी त्याची सेवा करावी म्हणून त्याला प्रभुत्व, वैभव व राज्य ही दिली; त्याचे प्रभुत्व अक्षय व अढळ आहे; त्याचे राज्य अविनाशी आहे.


मी तिला आपणासाठी देशात पेरीन; मी लो-रुहामेवर (दया न पावलेलीवर) दया करीन व लो-अम्मी (माझे लोक नव्हत) ह्यांना ‘तू अम्मी (माझे लोक) आहेस’ असे म्हणेन व ‘तू माझा देव आहेस’ असे ते मला म्हणतील.”


आणखी यशया म्हणतो, “इशायाला अंकुर फुटेल, तो परराष्ट्रीयांवर अधिकार करण्यास उभा राहील; त्याच्यावर परराष्ट्रीय आशा ठेवतील.”


तो होशेयाच्या पुस्तकात हेही म्हणतो की, “जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला ‘माझी प्रिय’ म्हणेन.”


तुझा देव परमेश्वर ह्याच्या ज्या ह्या आज्ञा मी आज तुला देत आहे त्या ऐकून तू काळजीपूर्वक पाळशील तर परमेश्वर तुला पुच्छ नव्हे तर मस्तक करील, तू खाली नव्हे तर वर राहशील.


सातव्या देवदूताने कर्णा वाजवला; तेव्हा स्वर्गात मोठ्या वाणी झाल्या; त्या म्हणाल्या : “जगाचे ‘राज्य’ आमच्या ‘प्रभूचे व त्याच्या ख्रिस्ताचे’ झाले आहे; आणि ‘तो युगानुयुग राज्य करील.”’


Lean sinn:

Sanasan


Sanasan