Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 22:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

24 मी त्याच्याशी निर्दोषतेने वागत असे, आणि मी अधर्मापासून स्वत:ला अलिप्त राखले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

24 मी त्यांच्यापुढे निर्दोष आहे आणि मी स्वतःला पापापासून दूर ठेवले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 22:24
14 Iomraidhean Croise  

अब्राम नव्व्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याला दर्शन देऊन म्हणाला, “मी सर्वसमर्थ देव आहे; तू माझ्यासमोर आहेस हे मनात वागवून चाल व सात्त्विकपणे राहा.


ही नोहाची वंशावळी. नोहा हा त्याच्या पिढीतील लोकांमध्ये नीतिमान व सात्त्विक मनुष्य होता; नोहा देवाबरोबर चालला.


मग परमेश्वराने नोहाला सांगितले, “तू आपल्या सगळ्या कुटुंबासह तारवात चल; कारण मी पाहिले आहे की ह्या पिढीत तूच माझ्यापुढे नीतिमान आहेस.


ऊस देशात एक पुरुष होता, त्याचे नाव ईयोब असे होते; तो सात्त्विक व सरळ होता; तो देवाला भिऊन वागे व पापापासून दूर राही.


हे परमेश्वरा, न्यायवाद ऐक, माझ्या आरोळीकडे लक्ष दे, माझ्या निष्कपट मुखाने उच्चारलेल्या प्रार्थनेकडे कान दे.


पाहा, अंतर्यामीची सत्यता तुला आवडते; तू माझ्या अंतर्यामाला ज्ञानाची ओळख करून दे.


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंत:करणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा उगम आहे.


नथनेलाला आपणाकडे येताना पाहून येशू त्याच्याविषयी म्हणाला, “पाहा, हा खराखुरा इस्राएली आहे; ह्याच्या ठायी कपट नाही!”


म्हणून आम्ही प्रभूच्या भयाची जाणीव बाळगून माणसांची समजूत घालतो; देवाला तर आम्ही प्रकट झालोच आहोत; आणि तुमच्या सदसद्विवेकबुद्धीतही प्रकट झालो आहोत अशी आशा मी धरतो.


त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे, म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले.


जे तुम्ही पूर्वी परके व दुष्कर्मे करत मनाने वैरी झाला होता,


त्या तुमचा आता त्याने स्वतःच्या रक्तमांसाच्या देहात मरणाच्या द्वारे समेट केला आहे, ह्यासाठी की त्याने तुम्हांला पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे आपणासमोर उभे करावे.


तर मग आपण एवढ्या मोठ्या साक्षीरूपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज गुंतवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे;


Lean sinn:

Sanasan


Sanasan