Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि गिबोनी लोकांच्या हवाली केले; त्यांनी त्यांना डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिले. त्या सातांचा एकदम निःपात झाला. त्यांना ठार मारण्यात आले ते दिवस हंगामाचे होते, ते जवाच्या हंगामाचे पहिले दिवस होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 या सात जणांना त्याने गिबोन्यांच्या स्वाधीन केले. गिबोन्यांनी त्यांना गिबा डोंगरावर परमेश्वरासमोर फाशी दिली. ते सातजण एकदमच प्राणाला मुकले त्यांना ठार केले गेले ते दिवस हंगामाच्या सुरुवातीचे होते. जवाच्या पिकाच्या सुरुवातीचा तो वसंतातील काळ होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याने त्यांना गिबोनी लोकांच्या हाती सोपवून दिले, ज्यांनी त्यांना मारून टाकले आणि त्यांची शरीरे डोंगरावर याहवेहसमोर प्रदर्शित केली. ते सातही जण एकत्र मरण पावले; हंगामाच्या सुरवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मारण्यात आले होते, जेव्हा जवाच्या हंगामाची सुरुवात झाली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 21:9
13 Iomraidhean Croise  

त्याच्या वंशातले सात जण आमच्या हाती द्या, म्हणजे परमेश्वराने निवडलेल्या शौलाच्या गिब्यात परमेश्वराप्रीत्यर्थ आम्ही त्यांना फाशी देतो.” तेव्हा राजा म्हणाला, “मी त्यांना देईन.”


लोक परमेश्वराचा कोश नगरात घेऊन आले व त्याच्या स्थानी म्हणजे जो तंबू दाविदाने त्याच्यासाठी उभा केला होता त्यात त्यांनी तो ठेवला; तेव्हा दाविदाने परमेश्वराला होमबली व शांत्यर्पणे अर्पण केली.


दावीद मीखलेस म्हणाला, “ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्याऐवजी मला निवडून आपल्या इस्राएली प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो; आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच.


त्यांच्या पाया पडू नकोस किंवा त्यांची सेवा करू नकोस; कारण मी तुझा देव परमेश्वर ईर्ष्यावान देव आहे; जे माझा द्वेष करतात त्यांच्या मुलांना तिसर्‍या-चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अन्यायाबद्दल मी शासन करतो;


त्या समयी जवस व सातू ह्यांचा नाश झाला; कारण सातू निसवले होते आणि जवसाला बोंडे आली होती.


पण गहू व काठ्यागहू ह्यांचा नाश झाला नाही; कारण ते अद्याप फारसे वाढले नव्हते.


आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “लोकांच्या सर्व प्रमुखांना पकडून परमेश्वराकरता त्यांना भरदिवसा फाशी दे म्हणजे परमेश्वराचा इस्राएलांवर भडकलेला राग जाईल.”


एखाद्या मनुष्याने मरणदंडास पात्र असा काही गुन्हा केल्यामुळे त्याला मृत्यूची शिक्षा झाली व त्याला झाडावर टांगले,


ह्याप्रमाणे नामी आपली सून मवाबी रूथ हिला घेऊन मवाब देशातून परत आली; त्या दोघी बेथलेहेमात आल्या तेव्हा सातूच्या हंगामास आरंभ झाला होता.


शमुवेल त्याला म्हणाला, “तुझ्या तलवारीने स्त्रिया जशा अपत्यहीन केल्या आहेत, त्याप्रमाणे तुझी माता स्त्रियांमध्ये अपत्यहीन होईल.” मग शमुवेलाने गिलगालात परमेश्वरासमोर अगागाचे तुकडे तुकडे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan