Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 21:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 दावीद व शौलाचा पुत्र योनाथान ह्यांची परमेश्वराच्या नावाने आणभाक झाली होती म्हणून शौलाचा नातू योनाथानाचा पुत्र मफीबोशेथ ह्याची राजाने गय केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 पण योनाथानाचा मुलगा मफीबोशेथ याला राजाने अभय दिले. योनाथान हा शौलाचा मुलगा. पण दावीदाने त्यास त्याच्या कुटुंबियांच्या सुरक्षिततेचे परमेश्वरास स्मरून वचन दिले होते, म्हणून मफीबोशेथला राजाने इजा पोचू दिली नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 शौलाचा पुत्र योनाथान व दावीदामध्ये याहवेहसमोर झालेल्या शपथेमुळे राजाने शौलाचा पुत्र योनाथान याचा पुत्र मेफीबोशेथ याची गय केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 21:7
16 Iomraidhean Croise  

राजा सीबाला म्हणाला, “मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.” सीबाने म्हटले, “मी प्रणाम करतो; माझे स्वामीराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी असावी.”


यरुशलेमकर राजाला भेटायला गेले तेव्हा राजाने विचारले, “मफीबोशेथा, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”


शौलाचा पुत्र योनाथान ह्याचा एक पुत्र होता, तो पायाने लंगडा होता; इज्रेल येथून शौल व योनाथान ह्यांच्याविषयीचे वर्तमान आले तेव्हा तो पाच वर्षांचा होता; त्या वेळी त्याची दाई त्याला घेऊन पळाली; ती घाईने पळत असता तो खाली पडून लंगडा झाला; त्याचे नाव मफीबोशेथ असे होते.


“योनाथानाप्रीत्यर्थ ज्याच्यावर आपण दया करावी असा शौलाच्या घराण्यातला अजून कोणी उरला आहे काय?” अशी चौकशी दाविदाने केली.


तर तू आपले पुत्र व चाकर ह्यांच्यासह त्याच्या जमिनीची लागवड कर; तुझ्या धन्याच्या पुत्राच्या निर्वाहासाठी शेताचे उत्पन्न आणत जा; पण तुझ्या धन्याचा पुत्र मफीबोशेथ माझ्या पंक्तीला नित्य भोजन करील.” सीबाचे पंधरा पुत्र व वीस चाकर होते.


मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.”


दावीद त्याला म्हणाला, “भिऊ नकोस, तुझा बाप योनाथान ह्याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन; तुझा बाप शौल ह्याची सर्व जमीन तुला परत देईन; आणि तू नित्य माझ्या पंक्तीस भोजन करावेस.”


मी म्हणतो की राजाची आज्ञा पाळ; तू देवाची शपथ घेतली आहेस म्हणून ती पाळ.


मग योनाथानाने दाविदाशी आणभाक केली; कारण तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला होता.


योनाथान दाविदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी, मी उद्या अथवा परवा ह्या सुमाराला माझ्या बापाचे मनोगत काढल्यावर तुझ्या हिताचे काही असले तर ताबडतोब तुला सांगून पाठवणार नाही काय?


एवढेच नव्हे तर माझ्या घराण्यावरून आपली कृपादृष्टी कदापि काढून घेऊ नकोस; परमेश्वर दाविदाच्या प्रत्येक शत्रूचा ह्या भूतलावरून उच्छेद करील तेव्हाही ती काढून घेऊ नकोस.


योनाथानाची दाविदावर प्रीती होती म्हणून त्याने त्याला पुन्हा आणभाक करायला लावले; कारण तो त्याला प्राणासमान प्रिय होता.


तेव्हा योनाथान दाविदाला म्हणाला, “सुखरूप जा; परमेश्वर तुझ्यामाझ्यामध्ये आणि तुझ्यामाझ्या संततीमध्ये निरंतर साक्षी असो; आपण दोघांनी परमेश्वराच्या नामाने आणभाक केली आहे.” मग तो उठून चालता झाला व योनाथान नगरात गेला.


तर तू आपल्या दासावर कृपा कर; कारण तू परमेश्वराची शपथ वाहून आपल्या दासाशी करार केला आहे; माझ्याकडून काही अपराध घडला असला तर तूच मला मारून टाक; तुझ्या बापाकडे मला कशाला नेतोस?”


त्या दोघांनी परमेश्वरापुढे करार केला; मग दावीद त्या उंचवट्यावरील झाडीत राहिला व योनाथान आपल्या घरी गेला.


तेव्हा दाविदाने शौलाजवळ अशीच आणभाक केली; मग शौल आपल्या घरी गेला आणि दावीद आपल्या लोकांसह गडावर गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan