२ शमुवेल 21:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 गोब येथे पलिष्ट्यांशी पुन्हा युद्ध झाले तेव्हा बेथलेहेम येथला यारेओरगीम ह्याचा पुत्र एलहानान ह्याने गथाचा गल्याथ ह्याचा1 वध केला; त्याच्या भाल्याची काठी साळ्याच्या तुरीएवढी होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 गोब येथेच पुन्हा पलिष्ट्यांशी युध्द झाले. तेव्हा बेथलहेमचा यारे ओरगीम याचा मुलगा एलहानान याने गथचा गल्याथ याला ठार केले. विणकराच्या तुरीएवढा त्याचा भाला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 गोब येथे पलिष्ट्यांबरोबर झालेल्या आणखी एका युद्धामध्ये बेथलेहेम येथील याईरचा पुत्र एलहानान याने गित्ती गल्याथाच्या भावाला ठार मारले ज्याच्या भाल्याची काठी विणकर्याच्या काठीसारखी होती. Faic an caibideil |