२ शमुवेल 21:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)
17 पण सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्याला त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्याला शपथ घालून सांगितले, “पुन्हा आपण आमच्याबरोबर लढाईला येऊ नका; इस्राएलाचा दीप आपण मालवू नये.”
17 पण सरुवेचा मुलगा अबीशय याने या पलिष्ट्याला मारले आणि दावीदाचे प्राण वाचवले. तेव्हा दावीदाबरोबरच्या लोकांनी दावीदाला शपथ घालून सांगितले, “तुम्ही आता लढाईवर येऊ नये. नाहीतर इस्राएल एका मोठ्या नेत्याला मुकेल.”
17 परंतु जेरुइयाहचा पुत्र अबीशाई दावीदाचा बचाव करण्यासाठी आला; त्याने त्या पलिष्ट्यावर हल्ला केला आणि त्याला ठार मारले. तेव्हा दावीदाच्या लोकांनी दावीदाला शपथ घेत सांगितले, “येथून पुढे पुन्हा आपण आमच्याबरोबर युद्धासाठी येणार नाही, म्हणजे इस्राएलचा दिवा विझणार नाही.”
आता पाहा, माझ्या कुळातले सर्व लोक आपल्या ह्या दासीवर उठले आहेत; ते म्हणतात की, ज्याने आपल्या भावाचा प्राणघात केला त्याला आमच्या स्वाधीन कर. आपल्या भावाचा त्याने वध केला आहे, म्हणून त्याचा प्राण त्याच्या भावाच्या प्राणाबद्दल घेऊ, आणि तुझ्या त्या वारसाचाही नाश करू; ह्या प्रकारे माझा उरलेला निखारा विझवून टाकून माझ्या पतीचे नाव व संतती भूतलावरून नष्ट करायला ते पाहत आहेत.”
मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”
लोकांनी म्हटले, “आपण येऊ नये; कारण आम्ही पळून गेलो तर त्याचे त्यांना काही वाटणार नाही; आमच्यातले अर्धे लोक मेले तरी त्यांना काही वाटायचे नाही; पण आपण तर आमच्यातल्या दहा हजारांच्या ठिकाणी आहात; म्हणून आपण नगरात राहूनच आम्हांला कुमक पाठवावी हे उत्तम.”
आणि त्याच्या पुत्राकडे मी एक वंश राहू देईन, म्हणजे माझ्या नामाची स्थापना व्हावी म्हणून मी यरुशलेम नगर निवडले आहे त्यात माझा सेवक दावीद ह्याची ज्योती माझ्यासमोर निरंतर जळत राहील.
तथापि दाविदाकरता त्याचा देव परमेश्वर ह्याने त्याचा दीप यरुशलेमेत कायम राहू दिला; त्याच्या पश्चात् त्याच्या पुत्राची त्याने स्थापना केली; आणि यरुशलेम नगर सुस्थितीत ठेवले;
तेव्हा योहानान बिन कारेह गदल्यास मिस्पा येथे गुप्तपणे म्हणाला, “मला जाऊन इश्माएल बिन नथन्या ह्याला ठार करू द्या; हे कोणाला कळणार नाही; त्याने आपला प्राण का घ्यावा? घेतल्यास आपणांकडे जमलेले सर्व यहूदी पांगतील व यहूदाच्या अवशेषाचा नाश होईल.”