Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 21:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 त्यावेळी तेथे रेफाई वंशातला इशबी-बनोब हा एक बलाढ्य मनुष्य होता. त्याच्या भाल्याचे वजनच तिनशे शेकेल पितळ होते. त्याच्याजवळ नवी कोरी तलवार होती. दावीदाला मारायचा त्याने प्रयत्न केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 इशबी-बेनोब नावाचा राफाह वंशातील एक पुरुष, ज्याचा कास्याचा भाला तीनशे शेकेल वजनाचा होता आणि तो नवीन तलवार घेऊन सज्ज होत म्हणाला, की तो दावीदाला जिवे मारेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 21:16
20 Iomraidhean Croise  

चौदाव्या वर्षी कदार्लागोमर व त्याच्या पक्षाचे राजे ह्यांनी येऊन अष्टरोथ-कर्णईम येथे रेफाई लोकांना, हाम येथे जूजी लोकांना, किर्याथाईमच्या मैदानात एमी लोकांना


त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.


ह्यानंतर पलिष्ट्यांशी गोब येथे पुन्हा युद्ध झाले, त्या वेळी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सफ ह्याला जिवे मारले.


गथ येथे पुन्हा युद्ध झाले तेव्हा तेथे रेफाई वंशातला एक मोठा धिप्पाड पुरुष होता, त्याच्या प्रत्येक हाताला व पायाला सहासहा अशी एकंदर चोवीस बोटे होती.


हे चार पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले.


पलिष्टी येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.


ते नेगेब प्रांतातून हेब्रोनास गेले; तेथे अहीमान, शेशय आणि तलमय हे अनाकाचे वंशज राहत होते; हे हेब्रोन मिसरातील सोअनापूर्वी सात वर्षे आधी बांधले होते.


त्या देशाचे रहिवासी मात्र बलवान आहेत आणि तेथील नगरे तटबंदीची असून फार मोठी आहेत; तेथे अनाकाचे वंशजही आम्ही पाहिले.


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


(पूर्वी तेथे एमी लोक राहत होते; ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते;


अनाकी लोकांप्रमाणे त्यांनाही रेफाई म्हणतात, पण मवाबी लोक त्यांना एमी म्हणतात.


ते लोक अनाकी लोकांप्रमाणे प्रबळ, पुष्कळ व धिप्पाड होते; पण परमेश्वराने अमोन्यांकरवी त्यांचा संहार केला; त्यांनी त्यांना हुसकावून लावून त्यांच्या जागी वस्ती केली.


(रेफाई लोकांपैकी शेष राहिला तो फक्‍त बाशानाचा राजा ओग. त्याचा पलंग लोखंडाचा होता; पाहा, तो अम्मोन्यांच्या राब्बा नगरात आहे ना? पुरुषाच्या हाताने त्याची लांबी नऊ हात व रुंदी चार हात आहे.)


तेथील लोक धिप्पाड व उंच असून अनाकी वंशातले आहेत हे तुला माहीतच आहे; ‘अनाकांच्या वंशजांशी कोण सामना करील’ असे म्हणतात हे तू ऐकलेच आहेस.


इस्राएल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही; मात्र गज्जा, गथ व अश्दोद ह्यांतले थोडे उरले.


कालेबाने शेशय, अहीमान व तलमय ह्या अनाकाच्या तीन वंशजांना तेथून घालवून दिले.


त्याच्या भाल्याचा दांडा साळ्याच्या तुरीसारखा होता; त्याच्या भाल्याचे पाते सहाशे लोखंडी शेकेल होते; त्याची ढाल वाहणारा त्याच्यापुढे चालला होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan