Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 21:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 पलिष्ट्यांनी इस्राएल लोकांशी पुन्हा युद्ध केले; तेव्हा दावीद आपले सैनिक बरोबर घेऊन पलिष्ट्यांशी लढला; त्या प्रसंगी दावीद थकून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 पलिष्ट्यांनी पुन्हा इस्राएलीशी युध्द पुकारले तेव्हा दावीद आपल्या लोकांबरोबर पलिष्ट्यांशी युध्द करायला निघाला. पण यावेळी दावीद फार थकून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 पुन्हा एकदा पलिष्टी आणि इस्राएल यांच्यामध्ये युद्ध झाले. दावीद आपल्या सैन्याला घेऊन पलिष्ट्यांशी लढण्यास गेला आणि तो थकून गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 21:15
14 Iomraidhean Croise  

तेव्हा रेफाई वंशातला इशबी-बनोब म्हणून एक इसम होता, त्याच्या भाल्याचे वजन तीनशे शेकेल पितळ भरले; त्याने नवी तलवार कंबरेला बांधली होती; त्याने दाविदाला मारायचा बेत केला;


दाविदाला अभिषेक करून इस्राएलाचा राजा केले आहे हे ऐकून सर्व पलिष्टी दाविदाच्या शोधासाठी निघाले; हे कानी येताच दावीद खाली आपल्या गढीत गेला.


मग पुन्हा पलिष्टी चढाई करून येऊन रेफाईम खोर्‍यात पसरले.


परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे दाविदाने केले आणि गेबापासून गेजेरापर्यंत तो पलिष्ट्यांना मार देत गेला.


ह्यानंतर दाविदाने पलिष्ट्यांना मार देऊन अंकित केले आणि त्यांच्या मेगेथ-अम्माची (मातृनगराची) सत्ता त्यांच्या हातून काढून घेतली.


ह्यानंतर पलिष्ट्यांशी गेजेर येथे पुन्हा युद्ध झाले; त्या प्रसंगी हूशाथी सिब्बखय ह्याने रेफाई वंशातला सिप्पय ह्याला जिवे मारले तेव्हा ते लोक शरण आले.


मी भावी पिढीला तुझे बाहुबल विदित करीपर्यंत पुढच्या पिढीतील सर्वांना तुझ्या पराक्रमाचे वर्णन करीपर्यंत, मी वयोवृद्ध होऊन माझे केस पिकले तरी, हे देवा, मला सोडू नकोस.


उतारवयात माझा त्याग करू नकोस; माझी शक्ती क्षीण होत चालली असता मला सोडू नकोस.


माझा देह व माझे हृदय ही खचली; तरी देव सर्वकाळ माझ्या जिवाचा आधार व माझा वाटा आहे.


त्या काळी घराचे रखवालदार कापतील; बळकट पुरुष वाकतील; दळणार्‍या थोड्या उरल्यामुळे त्यांचे काम बंद पडेल. खिडक्यांतून पाहणार्‍या अंध होतील.


Lean sinn:

Sanasan


Sanasan