२ शमुवेल 21:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे शौलाचा बाप कीश ह्याच्या थडग्यात पुरल्या; दाविदाच्या आज्ञेप्रमाणे लोकांनी सर्वकाही केले, त्यानंतर देशासाठी केलेली प्रार्थना देवाने ऐकली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 शौल आणि योनाथानाच्या अस्थी त्यांनी बन्यामीन प्रदेशातील सेला येथे पुरल्या. शौलाचे वडील कीश यांच्या कबरीत त्या पुरल्या राजाच्या आज्ञे बरहुकूम लोकांनी हे सर्व केले. तेव्हा देवाने लोकांची प्रार्थना ऐकली आणि तिला त्याने प्रतिसाद दिला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 त्यांनी बिन्यामीन प्रांतातील सेला येथे शौल व त्याचा पुत्र योनाथान यांच्या अस्थी, शौलाचा पिता कीश याच्या कबरेत पुरल्या आणि राजाने आज्ञापिल्याप्रमाणे सर्वकाही केले, त्यानंतर देशाच्या वतीने केलेल्या प्रार्थनेचे परमेश्वराने उत्तर दिले. Faic an caibideil |
आज तू माझ्याकडून गेलास म्हणजे बन्यामिनी प्रदेशाच्या सीमेवर सेल्सह येथे राहेलीच्या कबरेजवळ तुला दोन माणसे भेटतील; ते तुला म्हणतील, तू जी गाढवे शोधायला गेला होतास ती सापडली आहेत; आणि तुझ्या पित्याने गाढवांची चिंता करायचे सोडले आहे; आता त्याला तुमचाच घोर लागला आहे; तो म्हणतो, ‘मी आपल्या पुत्रासाठी आता काय करू?”’