२ शमुवेल 21:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 मग अय्याची कन्या रिस्पा ही हंगामाच्या सुरुवातीपासून आकाशातून त्या शवांवर पर्जन्यवृष्टी होईपर्यंत त्या खडकावर गोणपाट पसरून बसली; दिवसा आकाशातले पक्षी व रात्री वनपशू ह्यांना तिने त्या शवांना शिवू दिले नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 अय्याची कन्या रिस्पा हिने शोकाकुल होऊन एक मोठे कापड त्या गिबाच्या खडकावर अंथरले. तेव्हापासून पावसास सुरुवात होईपर्यंत ते तसेच राहू दिले. रिस्पाने रात्रंदिवस त्या मृत देहांची निगराणी केली. दिवसा पक्ष्यांनी आणि रात्री जंगली जनावरांनी त्याचे लचके तोडू नयेत म्हणून राखण केली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 तेव्हा अय्याहची मुलगी रिजपाह हिने गोणपाट घेतले, आणि ते स्वतःसाठी खडकावर पसरविले. हंगामाच्या सुरुवातीपासून त्या शरीरावर आकाशातून पाऊस पडेपर्यंत, तिने दिवसा पक्ष्यांना आणि रात्री जंगली प्राण्यांना त्या शवांना स्पर्श करू दिला नाही. Faic an caibideil |