Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 यवाबाने अमासाला विचारले, “बंधो, तू खुशाल आहेस ना?” असे म्हणून यवाबाने चुंबन घेण्याच्या निमित्ताने अमासाची दाढी उजव्या हाताने धरली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 त्याने अमासास विचारले, तुझे सर्व कुशल आहे ना? आणि अमासाचे चुंबन घेण्यास यवाबाने आपला उजव्या हाताने अमासाची दाढी धरून त्यास पुढे खेचले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 योआब अमासाला अभिवादन करीत म्हणाला, “माझ्या भावा तू कसा आहेस?” असे म्हणत त्याने अमासाची दाढी उजव्या हाताने पकडून त्याचे चुंबन घेतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:9
14 Iomraidhean Croise  

एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई.


अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय.


राजाने विचारले, “तरुण अबशालोम खुशाल आहे ना?” अहीमास म्हणाला, “यवाबाने एका सेवकाला व आपला दास जो मी त्याला पाठवले तेव्हा माझ्या दृष्टीला मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही.”


अबनेर हेब्रोनास परत आला तेव्हा त्याच्याशी एकान्ती बोलण्यासाठी म्हणून यवाब त्याला वेशीच्या आत घेऊन गेला; तेथे आपला भाऊ असाएल ह्याच्या रक्तपाताचा सूड उगवण्यासाठी त्याने अबनेराच्या पोटावर असा वार केला की तो प्राणास मुकला.


त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्याच शिरी उलटवील; त्याने तर माझा बाप दावीद ह्याला नकळत आपल्याहून अधिक नीतिमान व भल्या अशा दोन पुरुषांवर म्हणजे इस्राएलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अबनेर आणि यहूदाचा मुख्य सेनापती येथेरचा पुत्र अमासा ह्यांच्यावर तुटून पडून त्यांना तलवारीने जिवे मारले.


त्याच्या तोंडचे शब्द लोण्यासारखे मृदू होते, पण त्याचे हृदय युद्धप्रिय होते; त्याचे शब्द तेलापेक्षा बुळबुळीत पण नागव्या तलवारींसारखे होते.


वाणी कळवळ्याची पण मन दुष्ट असणे हे, रुप्याचा मुलामा दिलेल्या मडक्यासारखे होय.


मित्राने केलेले घाय खर्‍या प्रेमाचे आहेत, पण वैरी चुंबनांची गर्दी उडवतो.


त्या प्रसंगी इश्माएल बिन नथन्या व त्याच्याबरोबरची दहा माणसे ह्यांनी उठून गदल्या बिन अहीकाम बिन शाफान, ज्याला बाबेलच्या राजाने देशावर अधिपती म्हणून नेमले होते, त्याला तलवारीने ठार मारले.


भक्त पृथ्वीवर नाहीसा झाला आहे; माणसांत कोणी सरळ उरला नाही; ते सर्व रक्तपात करण्यास टपले आहेत, प्रत्येक जण जाळे टाकून आपल्या भावाची पारध करतो.


मग इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांना सोडवणारा म्हणून उभे केले; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हस्ते इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला नजराणा पाठवला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan