२ शमुवेल 20:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 ते गिबोनातल्या मोठ्या शिळेजवळ जाऊन पोहचले तेव्हा अमासा त्यांना येऊन भेटला. यवाबाने आपल्या अंगात चिलखत घातले होते आणि वरून कमरबंद कसलेला असून म्यानात घातलेली एक तलवार कमरेला लटकवली होती, तिचे म्यान निघून ती खाली पडली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 यवाब आणि त्याचे सैन्य गिबोनजवळच्या मोठ्या पहाडापाशी आले तेव्हा अमासा त्यांना सामोरा आला. यवाबाच्या अंगावर चिलखत होते. त्याने कमरबंद बांधला होता आणि म्यानात तलवार होती. यवाब आमासाच्या दिशेने चालू लागला तेव्हा त्याची तलवार म्यानातून निसटून पडली. यवाबाने ती उचलली आणि हातात धरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 ते गिबोनातील मोठ्या खडकाजवळ आले, तेव्हा अमासा त्यांना भेटण्यास आला. योआबाने त्याचा लष्करी अंगरखा घातला होता आणि वरून कंबरपट्टा व म्यानात खंजीर होता. जसा तो पुढे गेला, त्याच्या म्यानातून खंजीर बाहेर पडला. Faic an caibideil |