२ शमुवेल 20:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेर्यांकडे गेले. आणि यवाब यरुशलेमेस राजाकडे परत गेला. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 मग तिने गावातील लोकांस शहाणपणाने आपले म्हणणे पटवून दिले. तेव्हा लोकांनी बिक्रीचा पुत्र शबा याचे मुंडके धडावेगळे करून ते यवाबाकडे तटबंदी पलीकडे फेकले. यवाबाने रणशिंग फुंकले आणि सैन्याने नगर सोडले. जो तो आपल्या घरी परतला आणि यवाब यरूशलेम येथे राजाकडे आला. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 ती स्त्री आपल्या शहाणपणाचा हा सल्ला घेऊन सर्व लोकांकडे गेली आणि त्यांनी बिकरीचा पुत्र शबा याचे शिर छेदून योआबाकडे फेकून दिले. तेव्हा योआबाने रणशिंग फुंकले आणि त्याचे लोक शहर सोडून आपआपल्या घरी निघून गेले. आणि योआब यरुशलेमास राजाकडे परत गेला. Faic an caibideil |