Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 हा प्रकार काही तसा नव्हे. एफ्राईम डोंगरातल्या शबा बिन बिक्री नावाच्या एका माणसाने दावीद राजावर हात उचलला आहे; तेवढा माणूस आमच्या स्वाधीन करा म्हणजे मी नगर सोडून जाईन.” ती स्त्री यवाबाला म्हणाली, “त्या माणसाचे शिर तटावरून तुझ्याकडे फेकू.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 पण एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशातील बिक्रीचा पुत्र शबा नावाचा एक मनुष्य तुमच्या नगरात आहे. दावीद राजाविरुध्द त्याने बंड केले आहे. त्यास माझ्यापुढे हजर केलेत तर नगराला धक्कालावणार नाही. तेव्हा ती स्त्री यवाबाला म्हणाली, ठीक आहे. त्याचे मुंडके भिंतीवरून तुझ्याकडे टाकण्यात येईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 पण तसे काही नाही. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील एक मनुष्य जो बिकरीचा पुत्र शबा याने दावीद राजाविरुद्ध आपला हात उगारला आहे. हा मनुष्य माझ्या स्वाधीन कर, म्हणजे मी शहर सोडून जाईन.” ती स्त्री योआबाला म्हणाली, “त्याचे शिर तुझ्याकडे तटावरून टाकले जाईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:21
17 Iomraidhean Croise  

बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


तेव्हा सर्व इस्राएल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा ह्याच्यामागून गेले; पण यार्देनेपासून यरुशलेमेपर्यंतचे यहूदी लोक आपल्या राजाला धरून राहिले.


यवाब म्हणाला, “मी ते ग्रासून टाकावे अथवा त्याचा विध्वंस करावा ही गोष्ट माझ्यापासून दूर राहो; अगदी दूर राहो.


सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.


ह्याशिवाय सरेदा येथला एफ्राइमी नबाट ह्याचा पुत्र यराबाम हा शलमोनाचा सेवक होता, त्याची आई विधवा होती, तिचे नाव सरूवा; त्यानेही राजावर हात उचलला.


ते पत्र त्यांना जाऊन पोहचताच त्यांनी त्या सत्तर राजपुत्रांना पकडून त्यांचा वध केला आणि त्यांची शिरे टोपल्यात घालून त्याच्याकडे इज्रेल येथे पाठवून दिली.


गेहजी म्हणाला, “सर्वकाही ठीक आहे. माझ्या धन्याने आपणास असे सांगायला पाठवले आहे की, ‘एफ्राइमाच्या डोंगरी प्रदेशातून संदेष्ट्यांचे दोन शिष्य माझ्या येथे नुकतेच आले आहेत; त्यांच्यासाठी एक किक्कार चांदी व दोन पोशाख द्या.”’


कारण दानाकडून वाणी येत आहे, एफ्राईम डोंगराकडून अरिष्टाची घोषणा होत आहे.


मी इस्राएलास त्याच्या कुरणात परत आणीन, तो कर्मेल व बाशान ह्यांवर चरेल, एफ्राइमाच्या डोंगरावर व गिलादात त्याचा जीव तृप्त होईल.


नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला; त्याला त्यांनी एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास ह्याला दिलेल्या गिबा गावी मूठमाती दिली.


एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशातील गाश डोंगराच्या उत्तरेस तिम्नाथ-हेरेस येथे त्याच्या वतनाच्या सीमेवर त्यांनी त्याला मूठमाती दिली.


गिदोनाने एफ्राइमाच्या सर्व डोंगराळ प्रदेशात जासूद पाठवून लोकांना सांगितले की, “मिद्यान्यांना अडवायला या आणि बेथ-बारापर्यंत यार्देन नदीचे उतार रोखून धरा.” त्याप्रमाणे एफ्राइमाच्या सगळ्या लोकांना बोलावण्यात आले आणि त्यांनी बेथ-बारापर्यंतचे उतार रोखून धरले.


अबीमलेख मरण पावला हे पाहून इस्राएल लोक आपापल्या ठिकाणी गेले.


तो आपल्या लोकांना म्हणाला, “मी आपल्या स्वामीवर, परमेश्वराच्या अभिषिक्तावर, आपला हात टाकावा अशी गोष्ट परमेश्वर माझ्याकडून न घडवो, कारण तो परमेश्वराचा अभिषिक्त आहे;”


दावीद अबीशयास म्हणाला, “त्याचा वध करू नकोस, परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan