Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 शांतिप्रिय व विश्वासपात्र अशा इस्राएलांपैकी मी आहे. तू इस्राएलाच्या एका मातृनगराचा नाश का करू पाहत आहेस; परमेश्वराचे वतन तू का ग्रासू पाहतोस?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 इस्राएलमधील शांतताप्रिय, विश्वासू लोकांपैकी मी एक आहे. इस्राएलच्या एका महत्वाच्या शहराची तुम्ही नासधूस करत आहात. परमेश्वराच्या मालकीच्या वस्तूची तुम्ही मोडतोड का करता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आम्ही शांतताप्रिय आणि इस्राएलचे विश्वासू लोक आहोत. तुम्ही इस्राएलातील मातृनगराचा नाश करण्याचा प्रयत्न का करीत आहात? याहवेहच्या वतनाचा तुम्ही का नाश करावा?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:19
29 Iomraidhean Croise  

अब्राहाम जवळ जाऊन म्हणाला, “तू दुर्जनांबरोबर नीतिमानांचाही संहार खरेच करणार काय?


हे ऐकून, जो मनुष्य मला व माझ्या पुत्राला देवाच्या वतनातून नाहीसा करायला पाहत आहे, त्याच्या हातातून महाराज आपल्या दासीचा बचाव करतील.


तर लवकर जासूद पाठवून दाविदाला सांग की, आज रात्री रानातील नदीच्या उताराजवळ राहू नका; कसेही करून पार उतरून जा, नाहीतर राजा व त्याच्याबरोबरचे सर्व लोक नष्ट होतील.”


ती म्हणाली, “प्राचीन काळी लोक म्हणत की मसलत विचारायची तर ती आबेल नगरात विचारावी व असे केले म्हणजे झाले.


यवाब म्हणाला, “मी ते ग्रासून टाकावे अथवा त्याचा विध्वंस करावा ही गोष्ट माझ्यापासून दूर राहो; अगदी दूर राहो.


दाविदाने गिबोनी लोकांना विचारले, “तुमच्यासाठी मी काय करू? असे कोणत्या प्रकारचे प्रायश्‍चित्त मी करू की जेणेकडून तुम्ही परमेश्वराच्या वतनाचे अभीष्ट चिंताल?”


कारण हे प्रभू देवा, तू आमच्या वडिलांना मिसर देशातून काढले त्या वेळी तुझा सेवक मोशे ह्याच्या द्वारे तू वचन दिलेस, त्यानुसार हे लोक तुझे वतन व्हावे म्हणून भूतलावरल्या सर्व राष्ट्रांपासून तू त्यांना वेगळे केले आहेस.”


म्हणजे तुझ्या निवडलेल्यांचा उत्कर्ष माझ्या दृष्टीस पडेल. तुझ्या लोकांच्या आनंदाने मी आनंदित होईन. तुझ्या वतनाच्या लोकांबरोबर मी उत्सव करीन.


तर त्यांचा क्रोध आमच्यावर भडकला त्या वेळी त्यांनी आम्हांला जिवंत गिळून टाकले असते;


ज्या राष्ट्रांचा देव परमेश्वर आहे ज्या लोकांना त्याने आपल्या वतनाकरता प्रजा म्हणून निवडले आहे, ते धन्य!


आपली प्रजा म्हणजे याकोबवंश, आपले वतन म्हणजे इस्राएलवंश ह्यांचे पालन करण्यास दुभत्या मेंढ्यांमागे तो होता तेथून त्याने त्यांना आणले.


बाबेलचा राजा नबुखद्रेस्सर ह्याने मला खाऊन टाकले आहे, त्याने मला दळून टाकले आहे, त्याने मला रिकामे पात्र करून ठेवले आहे, त्याने मला अजगराप्रमाणे गिळले आहे. त्याने आपले पोट माझ्या पक्‍वानांनी भरले आहे; त्याने मला बाहेर फेकून दिले आहे.


मी बेल दैवताचा बाबेलात समाचार घेईन, त्याने गिळले ते त्याच्या तोंडावाटे मी काढीन, राष्ट्रांचा ओघ त्याच्याकडे वाहणार नाही; बाबेलचा तटही पडेल.


तुझ्या सर्व शत्रूंनी तुझ्यावर आपले तोंड पसरले आहे; ते धुत्कारून दात खातात; ते म्हणतात, “आम्ही त्याला गिळून टाकले आहे; खरोखर ह्याच दिवसाची आम्ही अपेक्षा करीत होतो; आम्हांला हा दिवस लाभला, हा आम्ही पाहून चुकलो.”


प्रभूने याकोबाची सर्व वसतिस्थाने गिळून टाकली आहेत, गय केली नाही; त्याने आपल्या क्रोधाने यहूदाच्या कन्येचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने ते धुळीस मिळवले आहेत; त्याने राज्य व त्यातले सरदार ह्यांना भ्रष्ट केले आहे.


प्रभू वैर्‍यासारखा झाला आहे; त्याने इस्राएलास गिळून टाकले आहे; त्याने त्याचे सर्व महाल गिळून टाकले आहेत, त्याने त्याचे दुर्ग मोडून टाकले आहेत; त्याने यहूदाच्या कन्येचे कण्हणे व आक्रंदन बहुगुणित केले आहे.


आणि पृथ्वीने आपले तोड उघडून ते, त्यांची कुटुंबे, कोरहाची सगळी माणसे व त्यांची सर्व मालमत्ता गिळून टाकली.


ज्या वेळी ती अडीचशे पुरुषांची टोळी अग्नीत भस्म होऊन मरण पावली त्या वेळी पृथ्वीने आपले तोंड उघडून कोरहाबरोबर त्यांनाही गिळून टाकले, व ते चिन्हादाखल झाले.


हे जे विनाशी त्याने अविनाशीपण परिधान केले, आणि हे जे मर्त्य त्याने अमरत्व परिधान केले, असे जेव्हा होईल तेव्हा “मरण विजयात गिळले गेले आहे” असा जो शास्त्रलेख आहे तो पूर्ण होईल.


कारण जे आम्ही ह्या मंडपात आहोत ते आम्ही भाराक्रांत होऊन कण्हतो; वस्त्र काढून टाकावे अशी आमची इच्छा आहे असे नाही, तर ते परिधान करावे अशी इच्छा बाळगतो; ह्यासाठी की, जे मर्त्य आहे ते जीवनाच्या योगे ग्रासले जावे.


युद्ध करायला तू एखाद्या नगरावर स्वारी करशील तेव्हा त्याच्याशी तहाचे बोलणे करून पाहा.


कारण परमेश्वराचे लोक हाच त्याचा वाटा, याकोब हाच त्याचा वतनभाग.


राजांकरता व सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांकरता करावी, ह्यासाठी की, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे.


मी दबोरा पुढे येईपर्यंत, इस्राएलात माता म्हणून मी प्रसिद्ध होईपर्यंत, इस्राएलात कोणी नेते उरले नव्हते; मुळीच उरले नव्हते.


मग शमुवेलाने तेलाची कुपी घेऊन शौलाच्या मस्तकावर ओतली व त्याचे चुंबन घेऊन म्हटले, “परमेश्वराने तुला हा अभिषेक केला आहे तो त्याच्या वतनाचा अधिपती व्हावे म्हणूनच ना?


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan