Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मग त्यांनी बेथ-माकाचे आबेल येथे शबा ह्याला घेरले, आणि नगरासमोर त्यांनी मोर्चा लावला; तो बाहेर कोटासमोर होता. मग यवाबाबरोबरचे सर्व लोक तट पाडण्यासाठी त्यावर आघात करू लागले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 यवाब आपल्या मनुष्यांसहीत आबेल-बेथ-माका येथे पोचला. त्याच्या सैन्याने नगराला वेढा दिला. तटबंदीभोवती त्यांनी माती कचऱ्याचा ढीग रचला. त्याच्यावरून भिंत पार करणे त्यांना सोयीस्कर ठरले असते. त्याचबरोबर त्यांनी भिंत पाडण्यासाठी भिंतीतील दगड फोडायला सुरुवात केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 योआबाबरोबरच्या सर्व सैन्याने येऊन शबाला आबेल-बेथ-माकाह येथे वेढा दिला. त्यांनी शहरापर्यंत जोडणार्‍या उतरणीपर्यंत मोर्चा लावला आणि तो बाहेरील तटबंदीच्या समोर होता. तट पाडण्यासाठी ते त्यावर वार करीत होते,

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:15
11 Iomraidhean Croise  

नंतर यवाब इस्राएली वंशाच्या लोकांतून जाऊन आबेल व बेथ-माका येथपर्यंत गेला व बेर्‍यांच्या सर्व प्रदेशातून गेला; मग तेही एकवट होऊन त्याच्या मागून गेले.


आसा राजाचे हे बोलणे मान्य करून बेन-हदादाने आपल्या सेनांच्या सरदारांना इस्राएली नगरांवर स्वारी करायला पाठवले; त्यांनी ईयोन, दान, आबेल-बेथ-माका, सगळा किन्नेरोथ व नफतालीचा सर्व प्रदेश जिंकला.


इस्राएलाचा राजा पेकह ह्याच्या वेळी अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ह्याने येऊन ईयोन, आबेल-बेथ-माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद व गालील तसेच सबंध नफताली प्रांत घेतला; तेथील लोक त्याने पाडाव करून अश्शूरास नेले.


ह्यासाठी अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो की तो ह्या नगरात प्रवेश करणार नाही, त्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन त्याच्याशी सामना करणार नाही आणि त्यावर मोर्चा लावणार नाही.


एक लहानसे नगर होते, त्यात थोडेच लोक होते; त्यावर एका मोठ्या राजाने चढाई करून त्याला वेढा दिला व त्याच्यासमोर मोठाले मोर्चे लावले.


म्हणून अश्शूराच्या राजाविषयी परमेश्वर म्हणतो, तो ह्या नगरापर्यंत येणार नाही; ह्यावर एकही बाण सोडणार नाही; तो ढाल घेऊन ह्याच्याशी सामना करणार नाही आणि ह्यावर मोर्चा रचणार नाही.


पाहा, हे नगर घेण्यासाठी त्याला वेढा घालणार्‍यांचे मोर्चे लागले आहेत; तलवार, दुष्काळ व मरी ह्यांमुळे ह्यांच्याशी युद्ध करणार्‍या खास्द्यांच्या हाती हे लागले आहे; तू बोललास तसे घडले आहे. पाहा, हे तुला दिसत आहे.


ह्या शहराची घरे व यहूदाच्या राजांची घरे मोर्चे व तलवार ह्यांच्या निवारणार्थ मोडून टाकली आहेत, त्यांविषयी परमेश्वर इस्राएलाचा देव म्हणतो,


कारण सेनाधीश परमेश्वर म्हणाला आहे की : “झाडे तोडून यरुशलेमेसमोर मोर्चा रचा. पारिपत्य करायचे ते ह्याच नगराचे; त्याच्यात जुलूमच जुलूम माजला आहे.


तिला वेढा पडला आहे, तिच्यासमोर बुरूज रचून मोर्चे बांधले आहेत, तिच्यापुढे तळ पडला आहे, टक्कर देऊन भिंत पाडण्याची यंत्रे तिच्याभोवती लागली आहेत, असे चित्र काढ.


कारण पुढे तुला असे दिवस येणार आहेत की त्यांत तुझे शत्रू तुझ्याभोवती मेढेकोट उभारतील व तुला वेढतील, तुझा चहूकडून कोंडमारा करतील,


Lean sinn:

Sanasan


Sanasan