Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 20:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 शबा नावाचा एक मनुष्य तेथे होता. हा बिक्रीचा मुलगा. बन्यामीन घराण्यातील हा शबा अगदी कुचकामी पण खोडसाळ प्रवृत्तीचा होता. त्याने एकदा रणशिंग फुंकले आणि लोकांस गोळा केले. आणि त्यांना म्हणाला, दावीदाकडे आपला भाग नाही. या इशायच्या मुलात आपला वाटा नाही. इस्राएलींनो, आपापल्या डेऱ्यात परत चला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 बिन्यामीन गोत्रातील बिकरीचा पुत्र शबा जो फार त्रासदायक होता, तो तिथे आला. त्याने रणशिंग फुंकले आणि ओरडून म्हणाला, “आम्हाला दावीदाबरोबर वाटा नाही, इशायच्या पुत्रामध्ये काही भाग नाही! इस्राएलातील प्रत्येकाने आपल्या तंबूत जावे!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 20:1
31 Iomraidhean Croise  

बन्यामिनाचे मुलगे बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.


अबशालोमाने इस्राएलाच्या सर्व वंशांकडे हेर पाठवून जाहीर केले की, “रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की, अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे.”


मग दाविदाने अबीशय व आपले सर्व सेवक ह्यांना सांगितले, “पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे ह्यात काय नवल! त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या! कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल.


शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो;


तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.


तेव्हा सर्व इस्राएल लोक दाविदाला सोडून देऊन बिक्रीचा पुत्र शबा ह्याच्यामागून गेले; पण यार्देनेपासून यरुशलेमेपर्यंतचे यहूदी लोक आपल्या राजाला धरून राहिले.


मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेर्‍यांकडे गेले. आणि यवाब यरुशलेमेस राजाकडे परत गेला.


सर्व अधर्मी लोकांना काट्यांप्रमाणे टाकून देतील, कारण त्यांना हाती धरता येत नाही;


राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही; हे इस्राएला, आपल्या डेर्‍याकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांत चालते झाले.


आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.”


राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही, हे इस्राएला, आपल्या डेर्‍यांकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग सर्व इस्राएल लोक आपापल्या डेर्‍याकडे चालते झाले.


रहबाम राजाने आपला बाप शलमोन जिवंत असता जी वृद्ध माणसे त्याच्या पदरी होती त्यांचा सल्ला घेतला; तो म्हणाला, “ह्या लोकांना उत्तर देण्याच्या बाबतीत तुम्ही मला काय मसलत देता?”


हे परमेश्वरा, ऊठ, त्याच्याशी सामना कर, त्याला चीत कर; आपल्या तलवारीने दुर्जनांपासून माझा जीव सोडव.


नीतिमानाला फार कष्ट होतात, तरी परमेश्वर त्या सर्वांतून त्याला सोडवतो.


फिर्याद करायला जाण्याची उतावळी करू नकोस, ती तू केलीस आणि तुझ्या शेजार्‍याने तुझी फजिती केली तर परिणामी काय करू असे तुला होऊन जाईल.


निखार्‍याला जसे कोळसे, विस्तवाला जसे सरपण, तसा भांडण पेटवायला भांडखोर लागतो.


आपसांत फूट पडलेले राज्य टिकत नाही.


त्याच्या नगरचे लोक त्याचा द्वेष करत, म्हणून त्यांनी त्याच्या मागोमाग वकील पाठवून सांगितले, ‘ह्याने आमच्यावर राज्य करावे अशी आमची इच्छा नाही.’


आता ज्या माझ्या वैर्‍यांच्या मनात मी त्यांच्यावर राज्य करू नये असे होते त्यांना येथे आणा व माझ्यादेखत ठार मारा.”


पेत्र त्याला म्हणाला, “तुम्ही माझे पाय कधीही धुवायचे नाहीत.” येशूने त्याला उत्तर दिले, “मी जर तुला धुतले नाही तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही.”


तुमच्यातून काही अधम पुरुष निघाले आणि त्यांनी तुम्हांला अपरिचित अशा ‘अन्य देवांची सेवा करायला या’ असे म्हणून आपल्या नगरातील लोकांना बहकवले,


ते खुशीत असताना गावातल्या गुंडांनी येऊन त्या घराला गराडा घातला व दार ठोठावून त्या म्हातार्‍या घरमालकाला ते म्हणू लागले, “तुझ्या घरी आलेल्या माणसाला बाहेर काढ म्हणजे आम्ही त्याला जाणू.”


तेथे गेल्यावर त्याने एफ्राइमाच्या डोंगराळ प्रदेशात रणशिंग फुंकले, तेव्हा त्याच्याबरोबर इस्राएल लोक डोंगराळ प्रदेशातून उतरले, आणि तो त्यांच्यापुढे चालला.


ती जाऊन शेतात कापणी करणार्‍यांच्या मागून सरवा वेचू लागली. आणि असे झाले की, शेताच्या ज्या भागी ती गेली तो अलीमलेखाच्या कुळातल्या बवाजाचा होता.


इस्राएलातले तीन हजार पुरुष निवडले; त्यांपैकी दोन हजार शौलाबरोबर मिखमाश येथे व बेथेलच्या डोंगरावर राहिले आणि एक हजार योनाथानाबरोबर बन्यामिनाच्या गिब्यात राहिले; वरकड सर्व लोकांना त्याने आपापल्या डेर्‍यांकडे रवाना केले.


एलीचे पुत्र अधम होते; त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती.


तेव्हा दाविदाबरोबर गेलेल्या लोकांपैकी जे वाईट व अधम लोक होते ते म्हणू लागले, “काही लोक आमच्याबरोबर आले नाहीत म्हणून आम्ही जी लूट आणली आहे तिच्यातली त्यांना आम्ही काहीएक देणार नाही; प्रत्येकाची बायकापोरे मात्र ज्याची त्याला देऊ, त्यांनी त्यांना घेऊन निघून जावे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan