Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 आणि त्याने गिलाद, अश्शूर्‍यांचा देश, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन वगैरे एकंदर इस्राएलावर त्याला राजा नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आणि त्याने ईश-बोशेथला गिलाद, अशेर, इज्रेल, एफ्राईम, बन्यामीन आणि सर्व इस्राएल यांच्यावर राजा म्हणून नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 त्याने गिलआद, अशुरी, येज्रील आणि एफ्राईम, बिन्यामीन व सर्व इस्राएलवर त्याला राजा नेमले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:9
19 Iomraidhean Croise  

तेव्हा लेआ म्हणाली, “मी मोठी धन्य आहे ! इतर स्त्रिया मला धन्य म्हणतील”; म्हणून तिने त्याचे नाव ‘आशेर’ ठेवले.


शौलाचा पुत्र ईश-बोशेथ इस्राएलावर राज्य करू लागला तेव्हा तो चाळीस वर्षांचा होता; त्याने दोन वर्षे राज्य केले, पण यहूदाचे घराणे दाविदाला धरून राहिले.


शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अबनेराचे पाठबळ होते.


शौलाचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्यापैकी तीन हजार आले; कारण हा वेळपावेतो बहुतेक बन्यामिनी लोक शौलाच्या घराण्यास धरून होते.


एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले.


गिलाद माझा आहे व मनश्शे माझा आहे; एफ्राईम माझे शिरस्त्राण आहे; यहूदा माझे राजवेत्र आहे.


आशेर वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्यांना अनुसरून जितके पुरुष वीस वर्षांचे व त्यांपेक्षा अधिक वयाचे असून युद्धास लायक होते त्या सर्वांची नोंद त्यांच्या नावांच्या अनुक्रमाने करण्यात आली;


एफ्राईम वंशजांची सरहद्द त्यांच्या-त्यांच्या कुळांप्रमाणे ही ठरली : त्यांच्या वतनाची सरहद्द पूर्वेपासून सुरू होऊन अटारोथ-अद्दार येथून वरल्या बेथ-होरोनास जाते.


ही सीमा तप्पूहा येथून निघून पश्‍चिम दिशेस जाऊन काना ओहळावरून समुद्राजवळ निघते; एफ्राइमाच्या वंशजांचे त्यांच्या कुळांप्रमाणे वतन हे होय;


त्याखेरीज मनश्शेच्या वंशजांच्या वतनापैकी काही नगरे आसपासच्या खेड्यापाड्यांसह एफ्राइमाच्या वंशजांसाठी वेगळी करून ठेवण्यात आली.


योसेफाचा ज्येष्ठ पुत्र मनश्शे ह्याच्या वंशाला चिठ्ठ्या टाकून मिळालेला वाटा हा : मनश्शेचा ज्येष्ठ पुत्र माखीर हा गिलादाचा बाप होता आणि तो योद्धा होता म्हणून त्याला गिलाद व बाशान मिळाले.


बन्यामिनाच्या वंशजांना त्यांच्या कुळांप्रमाणे मिळालेला वाटा हा : त्यांचा वाटा यहूदाचे वंशज आणि योसेफाचे वंशज ह्यांच्या प्रांताच्या दरम्यान होता.


यार्देन ही त्याची पूर्व सीमा होय. बन्यामिनाच्या संतानाचे वतन त्याच्या चतुःसीमांसहित त्यांच्या कुळांप्रमाणे हे आहे.


त्यांच्या सीमेच्या आत ही नगरे होती; इज्रेल, कसुल्लोथ व शूनेम;


मग रऊबेनी, गादी व मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोक इस्राएल लोकांतून कनान देशातल्या शिलोहून निघाले आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे त्यांनी काबीज केलेल्या गिलाद देशाकडे म्हणजे त्यांच्या वतनाकडे ते परत गेले.


म्हणून आशेराचे वंशज त्या देशाच्या कनानी रहिवाशांमध्ये राहिले; कारण त्यांनी त्यांना घालवून दिले नाही.


इकडे पलिष्ट्यांनी आपली सर्व सेना अफेकात एकत्र केली; इस्राएल लोकांनी इज्रेलात एका झर्‍याजवळ छावणी दिली होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan