Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 इकडे नेराचा पुत्र अबनेर जो शौलाचा सेनापती होता तो शौलाचा पुत्र ईश-बोशेथ ह्याला बरोबर घेऊन नदीपलीकडे महनाईम येथे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 नेरचा मुलगा अबनेर हा शौलाचा सेनापती होता. इकडे तो शौलाचा मुलगा इश-बोशेथ याला घेऊन महनाईम याठिकाणी आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्या दरम्यान, शौलाचा सेनापती नेरचा पुत्र अबनेरने शौलाचा पुत्र इश-बोशेथला महनाईम येथे आणले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:8
18 Iomraidhean Croise  

त्यांना पाहून याकोब म्हणाला, “हे देवाचे सैन्य आहे, म्हणून त्या ठिकाणाचे नाव त्याने ‘महनाईम’ (दोन सैन्ये) ठेवले.


मग याकोबाने सेईर देशात म्हणजे अदोम प्रांतात आपला भाऊ एसाव ह्याच्याकडे जासूद आगाऊ पाठवले.


मग दावीद महनाइमाला गेला. इकडे अबशालोम इस्राएल लोकांसह यार्देनेपार गेला.


अबनेर व त्याचे लोक रातोरात अराबामधून कूच करून यार्देनेपलीकडे गेले, आणि सगळा बिथ्रोन प्रदेश पायाखाली घालून महनाइमाला पोहचले.


हिंमत धरा, शूर व्हा; तुमचा स्वामी शौल मृत्यू पावला आहे आणि यहूदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमले आहे.” दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो


राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “आज इस्राएलातला एक सरदार, एक मोठा पुरुष पडला, हे तुम्हांला कळत नाही काय?


शौलाचे घराणे व दाविदाचे घराणे ह्यांच्यामध्ये जो कलह माजला होता त्यात शौलाच्या घराण्यास अबनेराचे पाठबळ होते.


शौलाचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्यापैकी तीन हजार आले; कारण हा वेळपावेतो बहुतेक बन्यामिनी लोक शौलाच्या घराण्यास धरून होते.


एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले.


नेराला कीश झाला; कीशास शौल झाला. शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब व एश्बाल हे होते.


नेरास कीश झाला, कीशास शौल झाला, शौलास योनाथान, मलकीशुवा, अबीनादाब, एश्बाल हे झाले.


मनुष्यवध करणार्‍यासाठी शरणपूर म्हणून नेमलेले गाद वंशाच्या वतनातले गिलादातील रामोथ व त्याचे गायरान, ह्यांखेरीज महनाईम व त्याचे गायरान,


शौलाच्या स्त्रीचे नाव अहीनवाम असे होते; ती अहीमास ह्याची कन्या. शौलाचा काका नेर ह्याचा पुत्र अबनेर हा सेनापती होता.


दावीद त्या पलिष्ट्याशी सामना करायला गेला हे पाहून शौलाने आपला सेनापती अबनेर ह्याला विचारले, “अबनेरा, हा तरुण पुरुष कोणाचा पुत्र आहे?” अबनेर म्हणाला, “महाराज, आपल्या जीविताची शपथ, मला ठाऊक नाही.”


दावीद त्या लोकांना आणि नेराचा पुत्र अबनेर ह्यांना मोठ्याने हाक मारून म्हणाला, “अबनेरा, ओ का देत नाहीस?” तेव्हा अबनेराने म्हटले, “राजाला हाक मारणारा असा तू कोण आहेस?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan