Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 तेव्हा दाविदाने याबेश-गिलादच्या लोकांकडे जासूद पाठवून त्यांना सांगितले की, “तुम्ही आपला स्वामी शौल ह्याला मूठमाती दिली ही तुम्ही त्याच्यावर दया केली, ह्याबद्दल परमेश्वर तुमचे कल्याण करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 तेव्हा दावीदाने याबेश गिलादाच्या लोकांकडे दूत पाठवून संदेश दिला, “आपला स्वामी शौल याचा दफनविधी करून तुम्ही जो दयाभाव दाखवला आहे त्याबद्दल परमेश्वर तुमचे भले करो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 तेव्हा दावीदाने याबेश-गिलआदवासियांकडे दूत पाठवून म्हटले, “याहवेह तुम्हाला आशीर्वादित करो, कारण तुम्ही आपला धनी शौल यांना पुरून त्यांच्याप्रित्यर्थ दया दाखविली आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:5
16 Iomraidhean Croise  

त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;


पण अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “परमेश्वर परात्पर देव, आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी ह्याच्यासमोर मी बाहू उभारून सांगतो की,


तू कालचा आलेला माणूस; मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडेतिकडे दौडवत का फिरवावे? तर तू आपला परत जा, आणि आपल्या भाऊबंदांनाही परत ने; दया व सत्य ही तुझ्यासमागमे राहोत.”


तेव्हा दाविदाने जाऊन शौल व त्याचा पुत्र योनाथान ह्यांच्या अस्थी याबेश-गिलाद येथील लोकांकडून आणल्या. पलिष्टी लोकांनी गिलबोवाच्या डोंगरावर शौलाचा वध केला तेव्हा त्यांनी बेथ-शानच्या चव्हाट्यावर त्यांना टांगले होते, तेथून त्यांची शवे त्या लोकांनी चोरून आणली होती.


आकाश व पृथ्वी ही निर्माण करणार्‍या परमेश्वराचा तुमच्यावर आशीर्वाद असो.


तेव्हा त्या पुरुषांनी तिला म्हटले, “तुम्ही ही आमची कामगिरी बाहेर फोडली नाही तर तुमच्यासाठी आम्ही आमचे प्राण देऊ; आणि परमेश्वर आम्हांला हा देश देईल तेव्हा आम्ही तुझ्याशी दयाळूपणाने व खरेपणाने वागू.”


त्यांनी विचारपूस केली, “मिस्पा येथे परमेश्वरासमोर आले नव्हते असे इस्राएल वंशांतले कोण आहेत?” तेव्हा त्यांना कळले की, याबेश-गिलादाहून त्या मेळाव्यास हजर राहण्यासाठी कोणीही छावणीत आले नव्हते.


नामी आपल्या सुनांना म्हणाली, “तुम्ही दोघी आता आपापल्या माहेरी जा; तुम्ही जशी माझ्या मृतांवर व माझ्यावर माया केली तशीच परमेश्वर तुमच्यावर करो.


नामी आपल्या सुनेला म्हणाली, “ज्या परमेश्वराने जिवंतावर व मृतांवरही आपली दया करायचे सोडले नाही तो त्याचे कल्याण करो.” नामी तिला आणखी म्हणाली, “हा माणूस आपल्या आप्तांपैकीच आहे. एवढेच नव्हे तर आपले वतन सोडवण्याचा त्याला हक्क आहे.”


तो म्हणाला, “मुली, परमेश्वर तुझे कल्याण करो, तू पहिल्यापेक्षा दुसर्‍या खेपेस अधिक प्रेमळपणा दाखवलास; कारण श्रीमंत किंवा गरीब अशा कोणाही तरुण पुरुषाच्या नादी तू लागली नाहीस.


नंतर अम्मोनी नाहाश ह्याने स्वारी करून याबेश-गिलादासमोर तळ दिला; तेव्हा याबेशचे सर्व लोक नाहाश ह्याला म्हणाले की, “आमच्याशी करारमदार कर म्हणजे आम्ही तुझे अंकित होऊ.”


त्यांनी त्या आलेल्या जासुदांना सांगितले, “तुम्ही याबेश-गिलादाच्या लोकांना जाऊन सांगा की, ‘उद्या ऊन होण्याच्या सुमारास तुम्हांला कुमक येऊन पोहचेल.” त्या जासुदांनी जाऊन याबेशच्या लोकांना हे सांगितले तेव्हा त्यांना फार आनंद झाला.


शमुवेल शौलाकडे आला तेव्हा शौल त्याला म्हणाला, “परमेश्वर आपले कल्याण करो; मी परमेश्वराची आज्ञा पाळली आहे.”


शौल म्हणाला, “परमेश्वर तुमचे कल्याण करो; कारण तुम्ही माझ्यावर दया केली आहे;


कोणाच्या तावडीत त्याचा शत्रू सापडला तर तो त्याला सहीसलामत जाऊ देईल काय? म्हणून आज तू जे वर्तन माझ्याशी केले आहेस त्याबद्दल परमेश्वर तुझे बरे करो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan