Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तेव्हा अबनेर यवाबाला हाक मारून म्हणाला, “तलवारीला निरंतर भक्ष्य देत राहायचे काय? ह्याचा अंती परिणाम दुःखदायक होणार हे तुला ठाऊक नाही काय? आपल्या भाऊबंदांच्या पाठीमागे लागण्याचे सोडून द्या, अशी आज्ञा तू आपल्या लोकांना कोठवर करणार नाहीस?”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तेव्हा यवाबाला हाक मारून अबनेरने त्यास विचारले, “आपापसातील या प्राणघातक लढाया अशाच चालू ठेवायच्या आहेत का? याचे परीणाम दुःखच होणार आहे हे तू जाणतोसच. आपल्याच भाऊबंदांचा पाठलाग थांबवायला तुझ्या लोकांस सांग.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 अबनेरने योआबाला हाक मारत म्हटले, “तलवारीने सर्वकाळ नाश करावा काय? तुला समजत नाही काय की याचा शेवट कटुत्वात होणार? आपल्या सोबतीच्या इस्राएली लोकांचा पाठलाग करण्याचे थांबविण्यास तुझ्या लोकांस तू आज्ञा कधी देणार?”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:26
17 Iomraidhean Croise  

दावीद त्या जासुदाला म्हणाला, “तू जाऊन यवाबाला सांग, ह्यावरून तू उदास होऊ नकोस, कारण तलवार दोन्ही पक्षांचा सारखाच संहार करते, तर तू अधिक नेटाने त्या नगराशी लढून त्याचा विध्वंस कर; ह्या प्रकारे तू त्याला हिंमत दे.”


तेव्हा अबनेर यवाबाला म्हणाला, “तरुण पुरुषांनी उठून आपल्यापुढे दोन हात खेळावेत.” यबावाने म्हटले, “बरे, त्यांनी उठावे.”


तेव्हा त्या सर्वांनी एकमेकांची मस्तके धरून आपल्या तलवारी आपल्याबरोबर झुंजणार्‍यांच्या कुशीत खुपसल्या व ते सर्व एकदम पडले; ह्यावरून त्या स्थळाचे नाव हेलकथहसूरीम (तीक्ष्ण धारेच्या सुर्‍यांचे क्षेत्र) असे पडले; हे गिबोनात आहे.


बन्यामिनी लोक अबनेरामागे एकवट होऊन एक फौज बनवून एका पहाडाच्या शिखरावर उभे राहिले.


यवाब म्हणाला, “देवाच्या जीविताची शपथ, तू बोलला नसतास तर खात्रीने लोक सकाळी निघून गेले असते व ते आपल्या बांधवांच्या पाठीमागे लागले नसते.”


“तुम्ही कोठवर शब्द शोधून योजत बसाल? तुम्ही समज घ्या, मग आम्ही बोलू.


“तुम्ही कोठवर माझ्या जिवाला दुःख देणार? कोठवर आपल्या शब्दांनी माझा चुराडा करणार?


अहो मनुष्यांनो, माझ्या गौरवाची अप्रतिष्ठा कोठवर चालणार? तुम्हांला निरर्थक गोष्टी कोठवर आवडणार आणि तुम्ही लबाडीची कास कोठवर धरणार? (सेला)


कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.


तुम्ही अमान्य होऊन बंड कराल तर तलवार तुम्हांला खाऊन टाकील; कारण परमेश्वराच्या तोंडचे हे वचन आहे.”


रानातल्या सर्व उजाड टेकड्यांवर लुटारू आले आहेत; कारण परमेश्वराची तलवार ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत देश ग्रासून टाकीत आहे; कोणत्याही मानवी प्राण्यास चैन नाही.


तुमच्या पुत्रांना मी ताडन केले ते व्यर्थ, त्याने ते शुद्धीवर आले नाहीत; फाडणार्‍या सिंहाप्रमाणे तुमच्याच तलवारीने तुमच्या संदेष्ट्यांना खाऊन टाकले आहे.


मी ध्वजा कोठवर पाहू? कर्ण्याचा शब्द कोठवर ऐकू?


तो दिवस प्रभू सेनाधीश परमेश्वर ह्याचा आहे, आपल्या शत्रूंवर सूड उगवण्याचा तो दिवस आहे. तलवार खाऊन तृप्त होईल, ती त्यांचे रक्त पोटभर पिईल; कारण प्रभू, सेनाधीश परमेश्वर ह्याने उत्तरेच्या देशात फरात नदीच्या तीरी यज्ञ मांडला आहे.


“हे मिसर देशात विदित करा, मिग्दोलात जाहीर करा; नोफ व तहपन्हेस ह्यांत जाहीर करा; म्हणा, ‘उभा राहा, सज्ज हो, कारण तुझ्याभोवतालचे सर्वकाही तलवारीने खाऊन टाकले आहे.’


त्यांच्या मसलतीमुळे तलवार त्यांच्या नगरांवर फिरेल. ती त्यांचे अडसर मोडून-तोडून खाऊन टाकील.


मग दुसर्‍या दिवशी कोणी भांडत असता तो त्यांच्यापुढे येऊन उभा राहिला व त्यांची समजूत घालण्याकरता त्यांना म्हणाला, ‘गृहस्थांनो, तुम्ही भाऊबंद आहात; एकमेकांवर अन्याय का करता?’


Lean sinn:

Sanasan


Sanasan