२ शमुवेल 2:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 तरी तो काही केल्या मागे सरेना; तेव्हा अबनेराने आपल्या भाल्याचा दांडा त्याच्या पोटात असा खुपसला की तो त्याच्या पोटात जाऊन पाठीतून निघाला; आणि तो तेथेच पडून मेला. असाएल मरून पडला त्या ठिकाणी जेवढे लोक आले तेवढे स्तब्ध उभे राहिले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तरीही असाएल ऐकेना. तेव्हा अबनेरने आपल्या भाल्याचे मागचे टोक असाएलच्या पोटात खुपसले. भाला सरळ त्याच्या पोटात घूसून पाठीतून निघाला. असाएलला तिथे तात्काळ मृत्यू आला असाएलचा मृतदेह तिथेच जमिनीवर पडलेला होता. लोकांनी ते पाहिले आणि ते तिथेच थांबले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 परंतु असाहेलने पाठलाग करण्याचे थांबविण्यास नाकारले; तेव्हा अबनेरने त्याच्या भाल्याचा दांडा असाहेलच्या पोटात खुपसला आणि तो भाला त्याच्या पोटातून जाऊन पाठीतून बाहेर आला. तो पडला आणि तिथेच मरण पावला. आणि प्रत्येकजण जे तिथून येत होते, ते असाहेल पडून मेला होता, तिथे थांबले. Faic an caibideil |