Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 2:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 2:18
19 Iomraidhean Croise  

शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते.


राजाचे मन अबशालोमाकडे लागले आहे, हे सरूवेचा पुत्र यवाब ह्याच्या लक्षात आले.


असाएलाने अबनेराचा पाठलाग केला; तो त्याच्या पाठीमागे लागला असता उजवीडावीकडे वळला नाही.


तो माझे पाय हरिणीच्या पायांसारखे करतो, आणि मला माझ्या उच्च स्थानांवर स्थापतो.


यवाबाचा भाऊ असाएल ह्या तिसांपैकी होता; बेथलेहेमच्या दोदोचा पुत्र एलहानान,


सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.


सैन्यातील वीर हे : यवाबाचा भाऊ असाएल, बेथलेहेमाच्या दोदोचा पुत्र एलहानान,


दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे :


एजेर मुख्य, ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा,


चौथ्या महिन्याचा चवथा सरदार यवाबाचा भाऊ असाएल हा होता; त्याच्यामागून त्याचा पुत्र जबद्या हा होता; त्याच्या वर्गात चोवीस हजार होते.


तो माझे पाय हरिणींच्या पायांसारखे करतो, आणि उंच जागांवर माझी स्थापना करतो.


मी परत येऊन भूतलावर आणखी पाहिले तो वेगवानांनाच शर्यतीत यश व वीरांनाच युद्धात विजयश्री मिळते असे नाही; शहाण्यांनाच अन्न व समंजसांनाच धन मिळते आणि ज्ञात्यांवरच अनुग्रह होतो असे नाही; तर सर्व कालवश व दैववश आहेत.


शिळोप्याची वेळ, छाया नाहीशी होण्याची वेळ येईपर्यंत तू फिरत राहा. माझ्या वल्लभा, हरिणाप्रमाणे, मृगीच्या पाडसाप्रमाणे वियोगपर्वतांवर फीर.


माझ्या वल्लभा, त्वरा कर, सुगंधी वनस्पतींच्या डोंगरांवर हरिणासारखा, मृगीच्या पाडसासारखा तू हो.


जो चपळ त्याला पलायन साधायचे नाही. बळकट आहे त्याला आपली शक्ती चालवता यायची नाही, वीराला आपला जीव वाचवता येणार नाही;


परमेश्वर प्रभू माझे सामर्थ्य आहे, तो माझे पाय हरणाच्या पायांसारखे करतो, तो मला माझ्या उच्च स्थानांवरून चालू देतो. [मुख्य गवयासाठी, माझ्या तंतुवाद्यांच्या साथीने गावयाचे]


तेव्हा दाविदाने अहीमलेख हित्ती आणि यवाबाचा भाऊ सरूवेचा पुत्र अबीशय ह्यांना म्हटले, “माझ्याबरोबर त्या छावणीत शौलाकडे येण्यास कोण तयार आहे?” अबीशय म्हणाला, “मी आपल्याबरोबर येतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan