२ शमुवेल 2:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 इकडे सरूवेचा पुत्र यवाब व दाविदाचे सेवक हे बाहेर पडले आणि त्या उभय सैन्यांची गिबोनाच्या तलावाजवळ गाठ पडली; तेथे एक सैन्य तलावाच्या एका बाजूला व दुसरे दुसर्या बाजूला उतरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 सरुवा हिचा मुलगा यवाब आणि दावीदचे सेवकही बाहेर पडून गिबोनला आले. गिबोनच्या तलावाशी या दोन गटांची गाठ पडली. तलावाच्या दोन बाजूला दोन्ही सैन्ये उतरली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 जेरुइयाहचा पुत्र योआब आणि दावीदाची माणसे बाहेर पडली आणि गिबोनाच्या तळ्याकडे भेटली. एक गट तळ्याच्या एका बाजूला खाली बसला आणि दुसरा गट तळ्याच्या दुसर्या बाजूला बसला. Faic an caibideil |
सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.