Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 19:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 इस्राएलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता; ते म्हणू लागले की, “राजाने आम्हांला आमच्या शत्रूंच्या हातातून सोडवले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला; पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 इस्राएलच्या सर्व घराण्यातील लोक आता बोलू लागले “पलिष्टी आणि आपले इतर शत्रू यांच्यापासून राजा दावीदाने आपल्याला संरक्षण दिले, पण तो अबशालोमपासून पळून गेला.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 इस्राएलच्या सर्व गोत्रातील लोकांचा आपसात वाद चालू होता, ते म्हणत होते, “राजाने आम्हाला आमच्या शत्रूच्या हातातून सोडविले आहे; तोच आहे ज्याने पलिष्ट्यांच्या हातातून आमची सुटका केली. परंतु आता अबशालोममुळे तो देशातून पळून गेला आहे;

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 19:9
15 Iomraidhean Croise  

हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकांना म्हणाला, “चला, आपण पळून जाऊ; न गेलो तर अबशालोमाच्या हातांतून कोणी सुटायचा नाही, निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपल्याला पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तलवार चालवील.”


तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.


आपण अबशालोमास राज्याभिषेक केला, पण तो युद्धात पडला; तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय?”


ह्या प्रकारे राजा नदी उतरून गिलगालास गेला; किम्हामही त्याच्याबरोबर गेला, यहूदाचे सर्व लोक व अर्धे इस्राएल लोक राजाला पलीकडे घेऊन गेले.


माझ्या प्रजेच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; मी राष्ट्रांचा अधिपती व्हावे म्हणून तू माझे रक्षण केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.


मग दावीद बाल-परासीम येथे आला; तेथे दाविदाने त्यांचा संहार केला; तो म्हणाला, “परमेश्वर माझ्यापुढे चालून पाण्याच्या लोंढ्याप्रमाणे माझ्या शत्रूंवर तुटून पडला.” ह्यावरून त्या ठिकाणाचे नाव बाल-परासीम (तुटून पडण्याचे ठिकाण) असे पडले.


लोकांच्या बखेड्यांपासून तू मला मुक्त केलेस; तू मला राष्ट्रांचा प्रमुख केलेस; जे लोक माझ्या परिचयाचे नव्हते ते माझे अंकित झाले.


मी त्यांना सांगितले, ‘ज्यांच्याजवळ सोने असेल त्यांनी ते काढून मला द्यावे; त्याप्रमाणे त्यांनी ते मला दिले; मग मी ते अग्नीत टाकले तो त्यातून हे वासरू निघाले.”’


ह्या प्रकारे दाविदाने गोफणगुंडा घेऊन त्या पलिष्ट्यावर सरशी केली आणि त्याचा वध केला; दाविदाच्या हाती तलवार नव्हती.


तेव्हा शौल म्हणाला, “तुम्ही दाविदाला जाऊन सांगा की, राजाला हुंडा नको; मात्र राजाच्या शत्रूंचा सूड उगवावा म्हणून त्याला पलिष्ट्यांच्या शंभर अग्रत्वचा हव्या आहेत.” शौलाचा ह्यात असा हेतू होता की अशाने तरी दावीद पलिष्ट्यांच्या हातून पतन पावेल.


कारण त्याने आपले शिर हातावर घेऊन त्या पलिष्ट्याचा संहार केला आणि परमेश्वराने इस्राएलाचा मोठा उद्धार केला हे पाहून आपणाला आनंद झाला; असे आहे तर आपण दाविदाला विनाकारण मारून निर्दोष रक्‍त सांडण्याचे पाप का करता?”


Lean sinn:

Sanasan


Sanasan