२ शमुवेल 19:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तर आता उठून बाहेर जा आणि आपल्या सेवकांचे समाधान करा; नाहीतर मी परमेश्वराची शपथ घेऊन सांगतो की, आपण बाहेर गेला नाहीत, तर आज रात्री आपल्याजवळ एकसुद्धा मनुष्य राहायचा नाही; आणि बाळपणापासून कधी ओढवले नाही असले संकट आपल्यावर ओढवेल.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 आता ऊठा आणि आपल्या सेवकांशी बोला. त्यांना प्रोत्साहन द्या. आताच उठून तुम्ही हे ताबडतोब केले नाही, तर आज रात्रीपर्यंत तुमच्या बाजूला एकही मनुष्य उरणार नाही याची मी परमेश्वरासमक्ष ग्वाही देतो. आणि हा तुमच्या बालपणापासूनच्या आयुष्यातला सर्वांत मोठा आघात असेल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 तर आता बाहेर जा आणि तुमच्या माणसांना उत्तेजित करा. मी जिवंत याहवेहची शपथ घेऊन सांगतो की, तुम्ही बाहेर गेला नाही, तर आज रात्र येईपर्यंत तुमच्याजवळ एकही मनुष्य असणार नाही. तुमच्या तारुण्यापासून आजपर्यंत जी सर्व अरिष्टे तुमच्यावर आली त्यापेक्षा हे तुमच्यासाठी अधिक वाईट असे होईल.” Faic an caibideil |