Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 19:43 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

43 इस्राएल लोक यहूद्यांना म्हणाले, “महाराज दहा हिश्शांनी आमचे आहेत; तुमच्याहून आमचा दाविदावर जास्त हक्क आहे; तर तुम्ही आम्हांला तुच्छ समजून आमच्या महाराजांना माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला का घेतला नाही?” इस्राएल लोकांच्या भाषणापेक्षा यहूदी लोकांचे भाषण कठोरपणाचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

43 इस्राएल लोक म्हणाले, “आमच्याकडे दावीदाचे दहा हिस्से आहेत. तेव्हा तुमच्यापेक्षा आमचा त्याच्यावर जास्त हक्क आहे. असे असून तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष केलेत.” असे का? आम्हास तुच्छ लेखले व राजाला परत माघारी आणण्यापूर्वी आमचा सल्ला घेतला नाही? इस्राएलीं पेक्षाही यहूदींची भाषा कठोर होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

43 यावर इस्राएली लोकांनी यहूदीयाच्या लोकांना उत्तर दिले, “राजामध्ये आम्हाला दहा हिस्से आहेत; म्हणून दावीदावर तुमच्यापेक्षा आमचा हक्क मोठा आहे. मग तुम्ही आम्हाला का तुच्छ लेखता? आमच्या राजाला परत आणण्याविषयी प्रथम आम्ही बोलणे केले नाही काय?” परंतु यहूदीयाच्या माणसांनी इस्राएलच्या लोकांपेक्षा अधिक जोराने दावा केला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 19:43
23 Iomraidhean Croise  

ह्या प्रकारे त्याने यहूदाच्या लोकांना एकदिल करून त्यांची मने वळवली; त्यांनी राजाकडे सांगून पाठवले की, “आपण आपले सर्व सेवक घेऊन माघारी या.”’


इस्राएलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता; ते म्हणू लागले की, “राजाने आम्हांला आमच्या शत्रूंच्या हातातून सोडवले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला; पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे.


बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


तेव्हा दावीद अबीशय ह्याला म्हणाला, “आता बिक्रीचा पुत्र शबा हा अबशालोमापेक्षाही आमचे अधिक वाईट करणार; तर तू आपल्या स्वामीचे लोक बरोबर घेऊन त्याचा पाठलाग कर, नाहीतर तो तटबंदी नगराचा आश्रय करून आमच्या दृष्टिआड लपून राहील.”


मग इस्राएलाचे सर्व वंश हेब्रोनात दाविदाकडे येऊन म्हणाले, “पाहा, आम्ही आपल्या हाडामांसाचे आहोत,


राजा ऐकत नाही हे पाहून सगळ्या इस्राएल लोकांनी त्याला म्हटले, “दाविदाचे आम्ही काय लागतो? इशायाचा पुत्र आमचा वतनभाग नाही; हे इस्राएला, आपल्या डेर्‍याकडे चालता हो; दाविदा, आता तू आपले घर सांभाळ.” मग इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांत चालते झाले.


गर्वामुळे भांडणे मात्र होतात. पण चांगली मसलत घेणार्‍यांजवळ ज्ञान असते.


मृदु उत्तराने कोपाचे निवारण होते; कठोर शब्दाने क्रोध उत्तेजित होतो.


कोणी धरणाला छिद्र पाडून पाणी वाहू द्यावे त्याचप्रमाणे भांडणाचा आरंभ होतो, म्हणून भांडण पेटण्यापूर्वी बाचाबाची सोडून द्यावी.


दुखवलेल्या भावाची समजूत घालणे मजबूत शहर जिंकण्यापेक्षा अवघड आहे; कलह म्हटले म्हणजे ते दुर्गाच्या अडसरांसारखे होत.


वाइटाने जिंकला जाऊ नकोस, तर बर्‍याने वाइटाला जिंक.


परंतु तुम्ही जर एकमेकांना चावता व खाऊन टाकता तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा.


मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद,


आपण पोकळ अभिमान बाळगणारे, एकमेकांना चीड आणणारे व एकमेकांचा हेवा करणारे होऊ नये.


तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना.


कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही.


तेव्हा एफ्राइमी पुरुष त्याला म्हणाले, “तू आमच्याशी असा का वागलास? तू मिद्यानाशी लढायला निघालास तेव्हा आम्हांला का बोलावले नाहीस?” अशी ते त्याच्याशी हुज्जत घालू लागले.


त्यानंतर देवाने अबीमलेख व शखेमकर ह्यांच्यामध्ये वैमनस्य उत्पन्न करणारा दुरात्मा पाठवला आणि शखेमकर अबीमलेखाशी कपटाने वागू लागले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan