Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 19:39 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

39 मग सारे लोक यार्देनेपलीकडे गेले; राजाही पलीकडे गेला; राजाने बर्जिल्लयाचे चुंबन घेऊन त्याचे अभीष्ट चिंतले; आणि तो स्वस्थानी परत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

39 राजाने बर्जिल्ल्यचे चुंबन घेऊन त्यास आशीर्वाद दिले. बर्जिल्ल्य आपल्या घरी परतला. राजा इतर लोकांबरोबर नदी ओलांडून पलीकडे गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

39 तेव्हा सर्व लोकांनी यार्देन पार केली आणि मग राजाने पार केली. राजाने बारजिल्लईचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिला आणि बारजिल्लई आपल्या घरी परत गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 19:39
18 Iomraidhean Croise  

त्याने त्याला असा आशीर्वाद दिला : “आकाशाचा व पृथ्वीचा स्वामी जो परात्पर देव तो अब्रामाला आशीर्वाद देवो;


सर्वसमर्थ देव तुला आशीर्वाद देवो, तुला फलद्रूप करून तुझी वंशवृद्धी अशी करो की तुझ्यापासून राष्ट्रसमुदाय उद्भवो;


लाबान मोठ्या पहाटेस उठला, त्याने आपल्या मुलामुलींचे चुंबन घेऊन त्यांना आशीर्वाद दिला. मग लाबान निघून आपल्या ठिकाणी परत गेला.


आणि सर्व भावांचे मुके घेऊन त्यांच्या गळा पडून तो रडला; त्यानंतर त्याचे भाऊ त्याच्याबरोबर बोलत बसले.


याकोब फारोला आशीर्वाद देऊन त्याच्यापुढून निघून गेला.


योसेफाने आपला बाप याकोब ह्याला आणून फारोपुढे हजर केले, तेव्हा याकोबाने फारोला आशीर्वाद दिला.


राजा अबशालोमाला म्हणाला, “माझ्या पुत्रा, नाही, आम्ही सर्वांनी येणे बरे नाही; आमचा भार तुझ्यावर पडू नये.” त्याने फार आग्रह केला तरी तो गेला नाही, पण त्याने त्याला आशीर्वाद दिला.


यवाबाने राजाकडे जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली; तेव्हा राजाने अबशालोमाला बोलावणे पाठवले; त्याने त्याच्याकडे येऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि राजाने अबशालोमाचे चुंबन घेतले.


राजा म्हणाला, “किम्हामाने माझ्याबरोबर पलीकडे यावे; तुला बरे वाटेल तसे मी त्याचे करीन; तू जे काही मला सांगशील ते मी तुझ्यासाठी करीन.”


होमबली व शांत्यर्पणे अर्पण केल्यावर दाविदाने सेनाधीश परमेश्वर ह्याच्या नामाने लोकांना आशीर्वाद दिला.


आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला. तेव्हा शौलाची कन्या मीखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली, “एखादा हलकट मनुष्य उघडाबोडका होतो तसे आज इस्राएलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले, तेव्हा इस्राएलाचे महाराज किती वैभवशाली दिसले!”


तेव्हा तो बैल सोडून एलीयाच्या मागून धावला; तो त्याला म्हणाला, “मला आपल्या आईबापांचे चुंबन घेऊन येऊ द्या; मग मी आपला अनुयायी होईन.” तो त्याला म्हणाला, “परत जा, मी तुझे काय केले?”


तेव्हा बलाम उठून आपल्या ठिकाणी परत गेला आणि बालाकही मार्गस्थ झाला.


शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला व त्याची आई मरीया हिला म्हटले, “पाहा, इस्राएलात अनेकांचे पडणे व पुन्हा उठणे होण्यासाठी व ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील असे एक चिन्ह होण्यासाठी ह्याला नेमले आहे;


तेव्हा ते सर्व फार रडले व त्यांनी पौलाच्या गळ्यात गळा घालून त्याचे पुष्कळ मुके घेतले.


पवित्र चुंबनाने सर्व बंधुवर्गाला सलाम करा.


मग पुन्हा त्या गळा काढून रडू लागल्या; अर्पा हिने आपल्या सासूचा मुका घेतला; पण रूथ तिला बिलगून राहिली.


तेव्हा दाविदाने शौलाजवळ अशीच आणभाक केली; मग शौल आपल्या घरी गेला आणि दावीद आपल्या लोकांसह गडावर गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan