Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 19:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 “माझ्या स्वामींनी माझा अपराध जमेस धरू नये, ज्या दिवशी माझे स्वामीराज यरुशलेम सोडून निघाले त्या दिवशी आपल्या दासाने दुष्टपणाचे वर्तन केले त्याचे स्मरण करू नये. महाराजांनी ते मनात ठेवू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 तो राजाला म्हणाला, स्वामी, माझ्या हातून घडलेल्या अपराधांचा विचार करू नका. महाराज, तुम्ही यरूशलेम सोडून गेलात तेव्हाची माझी कृत्ये विसरून जा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 आणि तो राजाला म्हणाला, “माझ्या स्वामीने माझा दोष मोजू नये. माझ्या स्वामीने ज्या दिवशी यरुशलेम सोडले, तेव्हा आपल्या दासाने केलेल्या वाईट कृत्याचे आपण स्मरण करू नये. राजाने ते आपल्या मनातून काढून टाकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 19:19
17 Iomraidhean Croise  

तिचा भाऊ अबशालोम तिला म्हणाला, “माझ्या भगिनी तुझा भाऊ अम्नोन हा तुझ्यापाशी गेला ना? तर गप्प बस; तो तुझा भाऊ आहे; तू ह्या गोष्टीचा खेद करू नकोस.” तेव्हा तामार आपला भाऊ अबशालोम ह्याच्या घरी उदास होऊन राहिली.


तर आता, अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका; कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे.”


राजाच्या घरची माणसे आणण्यासाठी व त्याला तिचा वाटेल तसा उपयोग करण्यासाठी एक नाव तेथे ठेवली होती. राजा यार्देन उतरून जाण्यासाठी आला तेव्हा गेराचा पुत्र शिमी त्याच्या पाया पडून म्हणाला,


ज्याच्या हिशेबी परमेश्वर अनीतीचा दोष लावत नाही व ज्याच्या मनात कपट नाही, तो मनुष्य धन्य!


आमच्याविरुद्ध आमच्या पूर्वजांची दुष्कर्मे आठवू नकोस; तुझी करुणा आमच्यावर सत्वर होवो; कारण आम्ही फार दुर्दशेत पडलो आहोत.


तुझ्यावर अधिपतीचा क्रोध झाला तर आपली जागा सोडू नकोस, कारण शांतीने मोठमोठी पापकर्मे टळतात.


मी आपल्यासाठी तुझे अपराध पुसून टाकतो; मीच तो, तुझी पातके स्मरत नाही.


परमेश्वर म्हणतो, ह्यापुढे कोणी आपल्या शेजार्‍यास, कोणी आपल्या बंधूस, परमेश्वराला ओळखा, असा बोध करणार नाहीत; कारण लहानापासून थोरापर्यंत ते सर्व मला ओळखतील; मी त्यांच्या अधर्माची क्षमा करीन, त्यांचे पाप मी ह्यापुढे स्मरणार नाही.”


तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “माझ्या प्रभू, आम्ही मूर्खपणाने वागून पातक केले आहे, त्याचा दोष आमच्यावर ठेवू नकोस.1


“मी निर्दोष जिवाला धरून देऊन पाप केले आहे.” ते म्हणाले, “त्याचे आम्हांला काय? तुझे तूच पाहून घे.”


म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता, देव ख्रिस्तामध्ये स्वत:बरोबर जगाचा समेट करत होता; आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले.


मी काय आजच पहिल्याने त्याच्यासाठी देवाकडे प्रश्‍न करू लागलो काय? असे माझ्याकडून न घडो; राजाने आपल्या ह्या सेवकाला आणि माझ्या बापाच्या सर्व घराण्याला असा बट्टा लावू नये; कारण ह्या प्रकरणी आपल्या दासाला अधिकउणे काहीच माहीत नाही.”


माझ्या स्वामींनी त्या अधम नाबालाचे काहीएक मनात आणू नये; तो आपल्या नावासारखाच आहे; त्याचे नाव नाबाल (मूर्ख) असे आहे, आणि त्याच्या ठायी मूर्खपणा आहे; ज्या तरुण पुरुषांना माझ्या स्वामींनी पाठवले होते त्यांना मी पाहिले नाही.


तेव्हा शौल म्हणाला, “मी अपराधी आहे; माझ्या पुत्रा दाविदा, माघारी ये; आज माझा प्राण तुझ्या दृष्टीला मोलवान वाटला म्हणून ह्यापुढे मी तुला काहीएक उपद्रव करणार नाही; मी मूर्खपणाने वागलो आहे, माझ्या हातून मोठा अधर्म झाला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan