Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 19:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग दावीद राजाने सादोक व अब्याथार याजकांना सांगून पाठवले की, “यहूदी वडील जनांना सांगा, ‘राजाला मंदिरात परत न्यावे असे इस्राएल लोकांचे बोलणे चालले आहे हे राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या मंदिरात नेण्याच्या बाबतीत तुम्ही सर्वांच्या मागे का राहता?

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 सादोक आणि अब्याथार या याजकांना राजा दावीदाने निरोप पाठवला, यहूदातील वडीलधाऱ्यांशी बोला. त्यांना सांगा, राजा दावीदाला गादीवर आणायला तुम्ही शेवटचे घराणे का आहा? राजाने पुन्हा परतण्याविषयी सर्वच इस्राएल लोकांची बोलणी चाललेली आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 दावीद राजाने सादोक आणि अबीयाथार याजकांना निरोप पाठवला: “यहूदीयाच्या वडीलजनांना विचारा, ‘जे सर्व इस्राएलात बोलले जात आहे ते राजाच्या कानी आले आहे, तर राजाला त्याच्या राजवाड्यात आणण्यास तुम्ही सर्वात शेवटचे का आहात?

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 19:11
11 Iomraidhean Croise  

तेव्हा सादोक व अब्याथार ह्यांनी देवाचा कोश परत यरुशलेमेला नेला व ते जाऊन तेथे राहिले.


यवाब म्हणाला, “तुझ्या नादी लागून वेळ घालवण्यात काही अर्थ नाही.” मग त्याने हाती तीन तीर घेऊन एला वृक्षावर जिवंत लटकत असलेल्या अबशालोमाच्या वक्षस्थळी ते भोसकले.


यवाबाच्या दहा शस्त्रवाहक तरुण पुरुषांनी त्याच्याभोवती जमून त्याच्यावर प्रहार करून त्याला ठार केले.


आपण अबशालोमास राज्याभिषेक केला, पण तो युद्धात पडला; तर आता राजाला परत आणण्याविषयी तुम्ही काही बोलत नाही हे काय?”


तेव्हा सर्व इस्राएल येऊन राजाला म्हणू लागले, “आमचे बांधव यहूदाचे लोक हे आपणाला चोरून छपवून घेऊन आले; महाराजांना त्यांच्या परिवाराला व त्यांच्या सर्व लोकांना यार्देनेपार आणले असे का?”


राजाने त्याच्या जागी यहोयादाचा पुत्र बनाया ह्याला मुख्य सेनापती नेमले आणि अब्याथाराच्या जागी सादोकाला याजक नेमले.


त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचा गौरव करावा.


म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो; देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो.


तसा आम्हांला अधिकार नाही असे नाही, पण आमचे अनुकरण करण्यासाठी आम्ही तुम्हांला कित्ता घालून द्यावा म्हणून असे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan