Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 18:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 मग दाविदाने एक तृतीयांश लोक यवाबाच्या ताब्यात दिले; एक तृतीयांश लोक यवाबाचा भाऊ अबीशय जो सरूवेचा पुत्र होता त्याच्या व बाकीचे एक तृतीयांश लोक इत्तय गित्तीच्या ताब्यात दिले; व त्यांना युद्धासाठी पाठवले, आणि राजाने लोकांना सांगितले, “मीही अवश्य तुमच्याबरोबर येतो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 सर्वांची त्याने तीन गटात विभागणी केली. यवाब, अबीशय यवाबाचा भाऊ आणि सरुवेचा मुलगा आणि गथ येथील इत्तय या तिघांना एकेक गटाचे प्रमुख म्हणून नेमले आणि सर्वांची रवानगी केली. तेव्हा राजा दावीद त्यांना म्हणाला, मी ही तुमच्याबरोबर येतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 दावीदाने एकतृतीयांश लोक योआबाच्या हाताखाली, एकतृतीयांश सैन्य योआबाचा भाऊ, जेरुइयाहचा पुत्र अबीशाईच्या हाताखाली आणि एकतृतीयांश इत्तय गित्तीच्या हाताखाली असे आपले सैन्य पाठवले. राजाने सैन्यास सांगितले, “मी स्वतः अवश्य तुम्हाबरोबर चालत जाईन.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 18:2
14 Iomraidhean Croise  

माझी तुला अशी मसलत आहे की, दानापासून बैरशेब्यापर्यंतचे अवघे इस्राएल लोक, समुद्रकिनार्‍यावरील रेतीप्रमाणे अगणित असे एकत्र कर आणि तू स्वतः युद्ध करायला जा.


पण सरूवेचा पुत्र अबीशय ह्याने दाविदाचा बचाव केला; त्या पलिष्ट्याला त्याने ठार मारले. मग दाविदाच्या लोकांनी त्याला शपथ घालून सांगितले, “पुन्हा आपण आमच्याबरोबर लढाईला येऊ नका; इस्राएलाचा दीप आपण मालवू नये.”


सरूवेचा पुत्र यवाबाचा भाऊ अबीशय हा तिघांचा प्रमुख होता. त्याने आपला भाला तीनशे माणसांवर चालवून त्यांना ठार केले व त्या तिघांमध्ये त्याने नाव मिळवले.


त्याचा मुख्य सेनापती सरूवेचा पुत्र यवाब हा होता व त्याचा अखबारनवीस (इतिहासलेखक) अहीलुदाचा पुत्र यहोशाफाट हा होता;


हे वर्तमान यवाबाकडे जाऊन पोहचले; यवाब हा अबशालोमाच्या पक्षाकडे वळला नव्हता; तरी तो अदोनीयाच्या पक्षाकडे वळला होता. यवाब हा परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीची शिंगे धरून राहिला.


लाखो लोकांनी मला गराडा घातला आहे. मी त्यांना भिणार नाही,


त्याने त्या तीनशे लोकांच्या तीन तुकड्या केल्या; त्या सर्वांच्या हातांत त्याने रणशिंगे व रिकामे घडे दिले; त्या घड्यांच्या आत दिवट्या ठेवल्या.


रात्रीच्या मधल्या प्रहराच्या आरंभी पहारा नुकताच बदलला तेव्हा गिदोन आपल्या शंभर पुरुषांसह छावणीच्या सीमेवरील टोकावर गेला; मग त्यांनी रणशिंगे फुंकून आपल्या हातांतील घडे फोडून टाकले.


आपल्या लोकांच्या तीन तुकड्या करून तो शेतात दबा धरून बसला; आणि लोक नगरातून बाहेर निघत आहेत असे पाहून त्याने त्यांच्यावर चाल करून त्यांचा संहार केला.


दुसर्‍या दिवशी शौलाने आपल्या लोकांच्या तीन तुकड्या केल्या आणि रात्रीच्या शेवटल्या प्रहरी (पहाटे) त्यांनी छावणीत येऊन ऊन होईपर्यंत अम्मोन्यांची कत्तल केली; आणि जे बाकी राहिले त्यांची एवढी दाणादाण केली की त्यांच्यातले दोनसुद्धा एकत्र राहिले नाहीत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan