Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 18:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

19 सादोकाचा पुत्र अहीमास म्हणाला की, “परमेश्वराने आपल्या शत्रूंचे पारिपत्य केले आहे, तर आता धावत जाऊन ही खबर राजाला देऊ द्या.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

19 सादोकाचा मुलगा अहीमास यवाबाला म्हणाला मला धावत जाऊन ही बातमी राजाला सांगू दे. परमेश्वराने त्याच्या शत्रूचा नि:पात केला आहे हे मी त्यास सांगतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

19 तेव्हा सादोकाचा पुत्र अहीमाज म्हणाला, “मी धावत जाऊन राजाला ही बातमी द्यावी, की याहवेहने राजाला त्यांच्या शत्रूच्या हातून सोडवून मुक्ती दिली आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 18:19
15 Iomraidhean Croise  

राजा सादोक याजकाला म्हणाला, “तू द्रष्टा आहेस ना? तू नगरात सुखरूप परत जा, आणि तुमच्याबरोबर तुमच्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे तुझा पुत्र अहीमास आणि अब्याथाराचा पुत्र योनाथान ह्यांनीही जावे.


पाहा, त्यांच्याबरोबर त्यांचे दोन पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहीमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत; जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठव.”


योनाथान व अहीमास हे एन-रोगेल येथे राहत होते; ते शहरात आहेत हे कोणास कळू नये म्हणून एक दासी जाऊन त्यांना खबर देत असे; त्यांनी जाऊन दावीद राजाला हे वर्तमान सांगितले.


यवाब त्याला म्हणाला, “आज ही खबर घेऊन जाऊ नकोस; दुसर्‍या एखाद्या दिवशी ती घेऊन जा; पण आज ती नेऊ नकोस; कारण राजाचा पुत्र मृत्यू पावला आहे.”


तो म्हणाला, “काहीही होवो, मला धावत जाऊ दे.” त्याने त्याला म्हटले, “धाव.” तेव्हा अहीमास दौड करून मैदानाच्या वाटेने कूशीच्या पुढे निघून गेला.


इतक्यात कूशीही येऊन म्हणाला, “स्वामीराजांसाठी मी खबर आणली आहे; परमेश्वराने आज न्याय करून आपल्यावर उठलेल्या सर्वांच्या हातून आपला बचाव केला आहे.”


तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


पोरक्यांना व पीडितांना न्याय मिळावा आणि मातीपासून घडलेल्या मनुष्याने त्यांना आणखी दहशत घालू नये म्हणून तू त्यांच्याकडे कान देतोस.


हे परमेश्वरा, तू क्रोधाविष्ट होऊन ऊठ; माझे शत्रू संतापले असता त्यांच्याविरुद्ध उभा राहा; माझ्यासाठी जागृत हो. तू न्यायाची योजना केलीच आहेस;


परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1


कारण तू माझा कैवार घेऊन न्याय केला आहेस; तू यथार्थ न्याय करीत राजासनावर बसला आहेस.


बाबेलच्या राजाचे नगर सर्वस्वी हस्तगत झाले हे त्याला कळवण्यास एकामागे एक हलकारे, एकामागे एक निरोपे धावत आहेत.


प्रिय जनहो, सूड उगवू नका, तर देवाच्या क्रोधाला वाट द्या; कारण असा शास्त्रलेख आहे की, “सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन,” असे प्रभू म्हणतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan