Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 18:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

18 आपले नाव चालवण्यास कोणी पुत्र नाही हे लक्षात घेऊन अबशालोमाने आपल्या हयातीत एक मनोरा उभारला होता, तो राजाच्या खोर्‍यात आहे. त्या मनोर्‍याला त्याने आपले नाव दिले; आजपर्यंत त्याला अबशालोमाचा स्मारकस्तंभ म्हणत आले आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

18 अबशालोमने राजाच्या खोऱ्यात पूर्वीच एक स्तंभ उभारलेला होता. आपले नाव चालवायला पुत्र नाही म्हणून त्याने त्या स्तंभाला स्वत:चेच नाव दिले होते. आजही तो अबशालोम स्मृतीस्तंभ म्हणून ओळखला जातो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

18 अबशालोमने आपल्या कारकिर्दीत राजाच्या खोर्‍यात स्वतःच्या स्मरणार्थ एक स्तंभ उभारला. कारण तो स्वतःशी म्हणाला, “माझे नाव पुढे चालविण्यासाठी मला पुत्र नाही.” म्हणून त्याने त्या स्तंभाला अबशालोमचे स्मारक असे नाव दिले होते. आजही ते त्याच नावाने ओळखले जाते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 18:18
13 Iomraidhean Croise  

मग ते म्हणाले, “चला, आपल्यासाठी एक नगर आणि गगनचुंबी शिखराचा एक बुरूज बांधू; आणि आपले नाव करू म्हणजे सर्व पृथ्वीच्या पाठीवर आपली पांगापांग होणार नाही.”


म्हणून त्या नगराचे नाव ‘बाबेल’ असे पडले, कारण त्या ठिकाणी परमेश्वराने सगळ्या पृथ्वीच्या भाषेचा घोटाळा करून तेथून त्यांना सर्व पृथ्वीच्या पाठीवर पांगवले.


कदार्लागोमर आणि त्याच्याबरोबरचे राजे ह्यांना मारून तो माघारी येत असता त्याला भेटायला सदोमाचा राजा शावेखिंड म्हणजे राजखिंड येथवर सामोरा गेला.


अबशालोमाला तीन पुत्र आणि एक कन्या झाली, तिचे नाव तामार, ही मुलगी अति रूपवान होती.


त्याच्या वंशाचा उच्छेद होवो; भावी पिढीत त्याचा नामनिर्देश न होवो.


त्यांनी आपल्या जमिनीस आपली नावे दिली; तरी त्यांच्या कबरांच त्यांची कायमची घरे आणि त्यांची पिढ्यानपिढ्यांची वसतिस्थाने होतील.


येथे तुझे काय आहे? येथे तुझे कोण आहे? तू आपल्यासाठी थडगे खोदवले आहेस; उच्च स्थळी थडगे खोदवले आहेस; खडक कोरून तू आपणासाठी जागा केली आहेस.


परमेश्वर म्हणतो, “हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे, हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावायचा नाही; कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहूदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही.”


त्या वेळी राजा म्हणाला, “हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”


नोबह ह्याने कनाथ व त्याच्या आसपासची खेडी काबीज केली आणि त्यांना नोबह हे आपले नाव दिले.


सकाळी अगदी पहाटेस शमुवेल उठून शौलाला भेटायला गेला; तेव्हा त्याला कोणी सांगितले की, “शौल कर्मेलास आला आहे आणि तेथे स्वतःच्या स्मरणार्थ त्याने एक विजयस्तंभ उभारला व चोहोकडे फिरून तो गिलगालास गेला आहे.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan