Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 18:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 तेव्हा लोकांनी अबशालोमाला खाली काढून वनातल्या मोठ्या खड्ड्यात टाकले व त्याच्यावर धोंड्यांची एक मोठी रास केली; मग सर्व इस्राएल लोक पळून आपापल्या डेर्‍यांकडे गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 यवाबाच्या मनुष्यांनी अबशालोमचा मृतदेह अरण्यातील एका खंदकात नेऊन टाकला. त्यावर दगडांची रास रचून तो खंदक भरून टाकला. अबशालोमाबरोबर आलेल्या इस्राएलींनी पळ काढला आणि ते घरी परतले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 त्यांनी अबशालोमला घेऊन, जंगलात एका खड्ड्यात फेकून टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली, त्या दरम्यान सर्व इस्राएली लोक आपआपल्या घरी पळून गेले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 18:17
15 Iomraidhean Croise  

यवाब घरात राजाकडे जाऊन म्हणू लागला, “आपल्या सेवकांनी आज आपला, आपल्या पुत्रांचा, कन्यांचा, पत्नींचा आणि आपल्या उपपत्नींचा प्राण वाचवला आहे; त्या आपल्या सेवकांचे तोंड आपण आज काळे केले आहे.


तेव्हा राजा उठून वेशीत जाऊन बसला. राजा वेशीत बसला आहे हे सर्व लोकांना कळले तेव्हा सर्व लोक राजासमोर आले. इकडे इस्राएल लोक आपल्या डेर्‍यांकडे पळून गेले. दावीद यरुशलेमेस परत येतो


इस्राएलाच्या सर्व वंशातल्या लोकांचा आपसात वाद चालला होता; ते म्हणू लागले की, “राजाने आम्हांला आमच्या शत्रूंच्या हातातून सोडवले, पलिष्ट्यांच्या हातातून आमचा बचाव केला; पण आता तो अबशालोमाच्या भीतीने देश सोडून पळून गेला आहे.


बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


मग त्या स्त्रीने ही आपली शहाणपणाची मसलत सर्व लोकांपुढे मांडली. तेव्हा त्यांनी बिक्रीचा पुत्र शबा ह्याचे शिर छेदून यवाबाकडे फेकून दिले. यवाबाने रणशिंग वाजवले आणि सर्व लोक नगराजवळून पांगून आपापल्या डेर्‍यांकडे गेले. आणि यवाब यरुशलेमेस राजाकडे परत गेला.


इस्राएलापुढे यहूदाची त्रेधा उडाली आणि ज्याने-त्याने आपापल्या डेर्‍याकडे पळ काढला.


तेव्हा योराम आपले सर्व रथ बरोबर घेऊन साईर येथे गेला; ज्या अदोमी लोकांनी त्याला घेरले होते त्यांना व रथांच्या नायकांना त्याने रात्रीच्या वेळी उठून मार दिला; तेव्हा लोक आपापल्या डेर्‍यांकडे पळून गेले.


नीतिमानांच्या स्मरणाने धन्यता वाटते; दुर्जनांचे नाव वाईट होऊन जाते.


आणि त्यांनी गावच्या वडीलवर्गाला सांगावे, ‘हा आमचा मुलगा हट्टी व अनावर आहे; हा आमचे ऐकत नाही; हा खादाड व मद्यपी आहे.’


मग त्याच्या गावच्या सर्व पुरुषांनी त्याला दगडमार करून ठार मारावे; अशा प्रकारे तू आपल्यामधून ह्या दुष्टाईचे निर्मूलन करावे, म्हणजे सर्व इस्राएल लोक हे ऐकून भितील.


सूर्यास्तसमयी यहोशवाच्या आज्ञेवरून लोकांनी त्यांना त्या झाडांवरून उतरवले आणि ज्या गुहेत ते लपले होते तिच्यात त्यांना टाकले आणि त्या गुहेच्या तोंडावर त्यांनी मोठमोठे धोंडे रचले. ते आजपर्यंत तसेच आहेत.


त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली, ती आजपर्यंत तेथे आहे. मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत.


आय नगराच्या राजाला त्याने संध्याकाळपर्यंत झाडावर फाशी दिले व सूर्यास्ताच्या वेळी यहोशवाच्या आज्ञेने त्यांनी त्याचे प्रेत झाडावरून उतरवून नगराच्या वेशीजवळ टाकले आणि त्याच्यावर धोंड्यांची मोठी रास केली; ती आजपर्यंत आहे.


मग पलिष्टी लढले आणि इस्राएल लोक पराभव पावून सगळे आपापल्या डेर्‍याकडे पळून गेले; त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्राएलाचे तीस हजार पायदळ कामास आले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan