Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 17:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्‍या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्‍या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्‍यांचीच हत्या होत आहे.’

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 17:9
10 Iomraidhean Croise  

म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.


हूशय आणखी म्हणाला, “तू आपल्या बापाला व त्याच्याबरोबरच्या पुरुषांना चांगला ओळखतोस; ते वीर पुरुष आहेत. रानात एखाद्या अस्वलीची पोरे कोणी नेली असताना जशी ती चवताळते तसे ते चवताळलेले आहेत. तुझा बाप मोठा योद्धा आहे; तो काही आपल्या लोकांबरोबर रात्रीचा राहायचा नाही.


इश्माएलाने पूर्वी ज्यांना मारले होते त्यांची प्रेते त्याने गदल्याच्या बाजूला एका विहिरीत टाकली होती; ही विहीर आसा राजाने इस्राएलाचा राजा बाशा ह्याच्या भीतीने खणली होती. ही विहीर इश्माएल बिन नथन्या ह्याने प्रेतांनी भरून काढली.


आय येथील माणसांनी त्यांच्यातली सुमारे छत्तीस माणसे मारून टाकली आणि आपल्या वेशीपासून शबारीमापर्यंत त्यांचा पाठलाग करून उतरणीपर्यंत त्यांना मारत नेले; त्यामुळे लोकांच्या काळजाचे पाणीपाणी झाले.


आम्ही त्यांना चाळवत चाळवत नगराबाहेर दूर नेईपर्यंत ते आमच्या पाठीस लागतील; कारण त्यांना वाटेल, पूर्वीप्रमाणेच आपल्याला भिऊन हे पळ काढत आहेत. ह्याप्रमाणे आम्ही त्यांच्यापुढे पळू लागू;


दावीद तेथून निसटून निघाला आणि अदुल्लामाच्या गुहेत गेला; हे ऐकून त्याचे भाऊ व त्याच्या बापाच्या घरची सर्व माणसे त्या गुहेत त्याच्याकडे गेली.


तुम्ही जाऊन आणखी खात्री करून घ्या; त्याची बसण्याउठण्याची जागा कोठे आहे, तेथे तो कोणाच्या दृष्टीस पडला, ह्याची सगळी माहिती काढा; कारण तो मोठा धूर्त आहे;


वाटेने जाताना तो एका मेंढवाड्याजवळ आला, तेथे एक गुहा होती; तिच्या आत शौल बहिर्दिशेस गेला. गुहेच्या अगदी आतल्या बाजूला दावीद व त्याचे लोक बसले होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan