Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 17:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 गहू जव, कणीक, हुरडा, शेंगा, डाळी, वाटाणे, मध, लोणी, मेंढरे तसेच गाईच्या दुधाचे पनीर याही वस्तू त्यांनी आणल्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 17:29
15 Iomraidhean Croise  

राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून-भागून पोहचला. तेथे त्याने विसावा घेतला.


राजाने सिबाला विचारले, “ह्याचे प्रयोजन काय?” सीबा म्हणाला, “गाढव हे राजघराण्यातल्या लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरांना खाण्यासाठी, आणि द्राक्षारस रानात थकल्या-भागलेल्यांना पिण्यासाठी आहे.”


तो थकला-भागलेला व कमकुवत असता मी त्याच्यावर छापा घालून त्याला घाबरे करीन; त्याच्याबरोबरचे सर्व लोक पळून जातील; आणि मग मी राजालाच तेवढे मारीन;


ते भुकेले व तान्हेले असल्यामुळे त्यांचा जीव त्यांच्या ठायी व्याकूळ झाला


कारण परमेश्वर देव हा सूर्य व ढाल आहे, परमेश्वर अनुग्रह व गौरव देतो; जे सात्त्विकपणे चालतात त्यांना उत्तम ते दिल्यावाचून तो राहणार नाही.


कोणी दिवसभर लाभाची हाव धरतात; पण नीतिमान देतो, हात आखडत नाही;


तान्हेल्यांसाठी पाणी आणा; तेमा देशातील रहिवाशांनो, पळणार्‍यांच्या भेटीस भाकरी घेऊन या.


तू आपले अन्न भुकेल्यांना वाटावे; तू लाचारांना व निराश्रितांना आपल्या घरी न्यावे; उघडा दृष्टीस पडल्यास त्याला वस्त्र द्यावे; तू आपल्या बांधवाला तोंड लपवू नये हाच तो उपास नव्हे काय?


आणि हेरोदाचा कारभारी खुजा ह्याची बायको योहान्ना, तसेच सूसान्ना व दुसर्‍या पुष्कळ स्त्रिया होत्या; त्या आपल्या पैशाअडक्याने त्यांची सेवाचाकरी करत असत.


पवित्र जनांच्या गरजा भागवा; आतिथ्य करण्यात तत्पर असा.


आणि हे खव्याचे दहा गोळे त्यांच्या सहस्रपतीस नेऊन दे; तुझे बंधू कसे आहेत ते पाहून त्यांच्याकडून काही खूण आण.


Lean sinn:

Sanasan


Sanasan