२ शमुवेल 17:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 अबशालोमाने यवाबाच्या जागी अमासा ह्याला सेनापती नेमले. यवाबाची आई सरूवा हिची नाहाश म्हणून एक बहीण होती; हिच्या अबीगल नावाच्या कन्येपाशी इथ्रा नावाचा एक इस्राएली पुरुष गेला होता, त्याचा पुत्र हा अमासा होय. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 अबशालोमने अमासा याला सेनापती केले. यवाबाची जागा अमासाने घेतली. अमासा इस्राएली इथ्राचा पुत्र. अमासाची आई अबीगईल. सरुवेची बहीण नाहाश हिची ही अबीगल कन्या. सरुवे यवाबाची आई. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 अबशालोमने योआबाच्या जागी अमासाची सेनापती म्हणून नेमणूक केली. अमासा हा इथ्रा इश्माएली याचा पुत्र असून, नाहाशाची कन्या, जेरुइयाहची बहीण योआबाची आई अबीगईल हिच्याशी त्याचा विवाह झाला होता. Faic an caibideil |
सरूवेचा पुत्र यवाब ह्याने माझ्याशी कसे वर्तन केले हे तुला ठाऊकच आहे; नेराचा पुत्र अबनेर आणि येथेरचा पुत्र अमासा हे जे इस्राएलाचे दोन सेनापती त्यांचे त्याने काय केले ते तुला ठाऊकच आहे; त्या दोघांचा त्याने घात केला. शांततेच्या समयी युद्धप्रसंगासारखा रक्तपात केला; त्यात त्याने आपला कमरबंद व आपली पायतणे भिजवली.
शौलाबरोबर युद्ध करण्यासाठी दावीद पलिष्ट्यांसह आला तेव्हा मनश्शेच्या लोकांपैकी काही लोक दाविदाला सोडून गेले होते. (तरी दाविदाने पलिष्ट्यांना साहाय्य केले नाही, कारण पलिष्ट्यांच्या सरदारांनी आपसांत सल्लामसलत करून त्याला घालवून दिले; ते म्हणाले, “तो आमची शिरे जोखमीत घालून आपला स्वामी शौल ह्याला पुन्हा जाऊन मिळायचा.”)