२ शमुवेल 17:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 आपल्या मसलतीप्रमाणे काम झाले नाही हे अहीथोफेलाने पाहिले तेव्हा तो आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या नगरास आपल्या घरी गेला, आणि आपल्या घराची सर्व व्यवस्था लावून त्याने गळफास घेतला; तो मृत्यू पावला, व त्याला त्याच्या बापाच्या थडग्यात पुरले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 इस्राएल लोकांनी आपला सल्ला मानला नाही हे अहिथोफेलच्या लक्षात आले. त्याने गाढवावर खोगीर टाकले आणि आपल्या गावाकडे प्रयाण केले. घरच्यांची पुढली तरतूद केली आणि स्वत:ला फास लावून घेतला. त्याच्या मृत्यूनंतर लोकांनी त्याचे त्याच्या वडीलांच्या कबरेतच दफन केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 इकडे अबशालोमने आपल्या सल्ल्यानुसार केले नाही असे अहीथोफेलने पाहिले, तेव्हा त्याने आपल्या गाढवावर खोगीर घातले आणि आपल्या जन्मगावी, आपल्या घराकडे निघून गेला. त्याने आपले घर नीटनेटके करून फाशी घेतली. तो मरण पावला आणि त्याला त्याच्या पित्याच्या कबरेत पुरले. Faic an caibideil |