Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 17:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

14 अबशालोम व सर्व इस्राएल लोक म्हणाले, “अहीथोफेल ह्याच्या मसलतीपेक्षा हूशय अर्की ह्याची मसलत बरी दिसते.” अहीथोफेलाची चांगली मसलत मोडून अबशालोमावर अरिष्ट आणावे म्हणून परमेश्वराने ही योजना केली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

14 अबशालोम आणि सर्व इस्राएल लोक म्हणाले, अहिथोफेलपेक्षा हूशय अर्की याचा सल्ला चागंला आहे. आणि तो सर्व लोकांस पसंत पडला, कारण ती परमेश्वराची योजना होती. अबशालोमला अद्दल घडावी म्हणून अहिथोफेलचा चांगला सल्ला थोपवून कुचकामी ठरवण्याचा तो परमेश्वराचा बेत होता. अशा प्रकारे तो अबशालोमला अद्दल घडवणार होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

14 तेव्हा अबशालोम आणि सर्व इस्राएली लोक म्हणाले, “हूशाई अर्कीचा सल्ला अहीथोफेलच्या सल्ल्यापेक्षा अधिक बरा आहे.” कारण अबशालोमवर अरिष्ट आणावे म्हणून अहीथोफेलचा चांगला सल्ला विफल करण्याची याहवेहने योजना केली होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 17:14
25 Iomraidhean Croise  

त्यावर तो त्याला म्हणाला, “ह्यापुढे तुला याकोब म्हणणार नाहीत, तर इस्राएल म्हणतील, कारण तू देवाशी व मनुष्यांशी झगडून प्रबळ ठरला आहेस.”


कोणी दाविदाला सांगितले की, “अहिथोफेल हाही बंडखोरांना सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे.” हे ऐकून दावीद म्हणाला, “हे परमेश्वरा, अहीथोफेलाची मसलत फोल कर.”


तर तू नगरात परत जाऊन अबशालोमाला म्हण, ‘महाराज, मी आपला दास होतो; पूर्वी जशी मी आपल्या पित्याची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करतो;’ असे केल्याने तू माझ्यासाठी अहीथोफेलाची मसलत निष्फळ करशील.


त्या काळात अहीथोफेल जी मसलत देत असे ती जशी काय देवाजवळ मागितलेल्या कौलाप्रमाणे असे; दावीद व अबशालोम ह्या दोघांना जी मसलत तो देत असे ती अशीच असे.


अशा प्रकारे राजाने लोकांचे ऐकले नाही; ह्याचे कारण हेच की जे वचन परमेश्वराने शिलोकर अहीया ह्याच्या द्वारे नबाटाचा पुत्र यराबाम ह्याला दिले होते ते पूर्ण व्हावे अशी देवाची योजना होती.


ह्या वृद्ध पुरुषांनी दिलेला सल्ला रहबामाने टाकून त्याच्याबरोबर लहानाचे मोठे झालेले तरुण पुरुष त्याच्या पदरी होते त्यांचा सल्ला घेतला.


तो त्याला असे बोलू लागला तेव्हा राजा त्याला म्हणाला, “मी तुला आपला मंत्री केले आहे काय? गप्प राहा; तुला मार पाहिजे काय?” तेव्हा संदेष्टा गप्प राहिला. मग तो म्हणाला, “मला ठाऊक आहे की देवाने तुझा नाश करण्याचे ठरवले आहे, कारण तू हे असे केले आहेस व माझा सल्ला घेतला नाहीस.”


अमस्या काही केल्या ऐकेना; कारण ते अदोमाच्या दैवतांच्या नादी लागले होते म्हणून त्यांना त्यांच्या शत्रूंच्या स्वाधीन करावे असा देवाचा संकेत झाला होता.


देवाने आमच्या शत्रूंची मसलत व्यर्थ केली हे आमच्या शत्रूंनी ऐकले तेव्हा आम्ही सगळे कोटाकडे परत जाऊन आपापल्या कामावर रुजू झालो.


तो राजमंत्र्यांना अनवाणी घेऊन जातो; तो न्यायाधीशांना मूढ ठरवतो.


राष्ट्रे आपण केलेल्या खाचेत स्वतःच पडली आहेत; त्यांनी गुप्तपणे मांडलेल्या जाळ्यात त्यांचेच पाय गुंतले आहेत.


परमेश्वराने न्यायनिवाडा करून स्वतःला प्रकट केले आहे; दुर्जनास त्याच्याच हातच्या पाशात त्याने गुंतवले आहे. (हिग्गायोन सेला)1


तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे.


मनुष्याच्या मनात अनेक मसलती येतात, परंतु परमेश्वराची योजना स्थिर राहते.


परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत.


मसलत करा, पण ती निष्फळ होईल; विचार प्रकट करा, पण तो टिकणार नाही; कारण आमच्यासन्निध देव आहे.1


प्रभूने आज्ञा केली नसल्यास कोण बोलला आणि त्याप्रमाणे घडून आले?


ते कर्मेलाच्या माथ्यावर लपून राहिले, तरी मी त्यांचा सुगावा लावीन व तेथून त्यांना ओढून आणीन; ते समुद्राच्या तळी माझ्या दृष्टिआड लपून राहिले, तरी मी तेथे सर्पाला आज्ञा करीन म्हणजे तो त्यांना डसेल.


अन्यायी कारभार्‍याने शहाणपण केले. ह्यावरून धन्याने त्याची वाहवा केली; कारण ह्या युगाचे लोक आपल्या-सारख्यांविषयी प्रकाशाच्या लोकांपेक्षा शहाणे असतात.


कारण ह्या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपण आहे; कारण “तो ज्ञान्यांस त्यांच्याच धूर्तपणात धरतो,” असा शास्त्रलेख आहे.


पण हेशबोनाचा राजा सीहोन आम्हांला त्याच्या देशातून जाऊ देईना; कारण तुमचा देव परमेश्वर ह्याने त्याला तुमच्या हाती द्यावे म्हणून त्याची वृत्ती कठोर केली व त्याचे मन कठीण केले; आज तो देश तुमच्या हाती आहे.


कारण परमेश्वराचा असा हेतू होता की, आपण मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करावा, आणि त्यांना काहीच दयामाया न दाखवता त्यांचा संहार करावा. त्यांनी इस्राएलाशी युद्ध करायला बाहेर पडावे म्हणून त्याने त्यांची मने कठीण केली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan