Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 17:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 म्हणजे जो धैर्यवान आहे, ज्याचे हृदय सिंहासारखे आहे, अशा पुरुषाचीही गाळण उडेल; कारण सर्व इस्राएल लोकांना ठाऊक आहे की तुझा बाप लढवय्या असून त्याच्याबरोबरचे लोकही वीर आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 मग तर सिंहासारख्या शूरलोकांचेही धैर्य खचेल कारण तुमचे वडील पराक्रमी आहेत आणि त्यांच्या बाजूची माणसे शूर आहेत हे सर्वच इस्राएल लोकांस ठाऊक आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 तेव्हा सर्वात धैर्यशाली शिपाई, ज्याचे हृदय एखाद्या सिंहासारखे आहे तो भीतीने गळून जाईल, कारण सर्व इस्राएली लोकांना माहीत आहे की, तुझा पिता योद्धा आहे आणि त्याच्याबरोबर असणारे सर्व शूर आहेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 17:10
17 Iomraidhean Croise  

यहूदा सिंहाचा छावा आहे; माझ्या पुत्रा, तू शिकार करून डोंगरात गेला आहेस; तो सिंहासारखा, सिंहिणीसारखा दबा धरून बसला आहे, त्याला कोण छेडणार?


शौल व योनाथान प्रेमळ व मनमिळाऊ असत; जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडाहून वेगवान व सिंहाहून बलवान होते.


पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्‍या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल.


कबसेल येथला एक माणूस होता; त्याने पुष्कळ पराक्रम केले होते; त्याच्या यहोयादा नामक पुत्राचा बनाया म्हणून एक पुत्र होता, त्याने मवाबी अरीएल ह्याच्या दोघा पुत्रांना ठार मारले; आणि बर्फाच्या दिवसांत कूपात उतरून एका सिंहाला ठार केले.


पूर्वी तू आपल्या भक्तांशी दृष्टान्ताने बोललास; तू म्हणालास, “मी एका वीराकडे साहाय्य करण्याचे सोपवले आहे; लोकांतून निवडलेल्या एकाला मी श्रेष्ठ पदास चढवले आहे.


तेव्हा अदोमाचे अधिपती हैराण झाले; मवाबाचे नायक थरथरा कापत आहेत; सर्व कनानवासी गलित झाले आहेत.


कोणी पाठीस लागले नसता दुर्जन पळतात, पण नीतिमान सिंहासारखे निर्भय राहतात.


पाहा, तो शलमोनाचा मेणा येत आहे; त्याच्याबरोबर साठ वीर पुरुष चालत आहेत; ते इस्राएलाच्या वीर पुरुषांपैकी आहेत.


ह्यामुळे सर्वांचे बाहू गळले आहेत, प्रत्येकाचे हृदय विरघळले आहे;


मिसर देशाविषयीची देववाणी; परमेश्वर शीघ्रगती मेघावर आरूढ होऊन मिसराकडे येत आहे; मिसरातील मूर्ती त्याच्यासमोर कापत आहेत आणि मिसराचे हृदय आतल्या आत विरघळत आहे.


त्यांचे हृदय गलित व्हावे, व त्यांचे पाय पराकाष्ठेचे लटपटावेत म्हणून मी त्यांच्या सर्व वेशींवर घात करणारी तलवार चालवली आहे; अहो! ती विजेप्रमाणे चमकावी असे तिला केले आहे, ती वधासाठी उपसली आहे.


आम्ही कोठे निघालो आहोत? तेथील लोक आमच्यापेक्षा धिप्पाड व उंच आहेत; तेथील नगरे मोठी असून त्यांचे तट गगनापर्यंत पोहचले आहेत आणि तेथे अनाकाचे वंशज आम्ही पाहिले, असे आमच्या भाऊबंदांनी आम्हांला सांगितले तेव्हा आमच्या हृदयाचे पाणीपाणी झाले.’


अग्नीची शक्ती नाहीशी केली; ते तलवारीच्या धारेपासून बचावले, ते दुर्बळांचे सबळ झाले, ते लढाईत पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली.


तेव्हा एका तरुण सेवकाने उत्तर दिले, पाहा, मी बेथलेहेमकर इशाय ह्याचा एक पुत्र पाहिला आहे; तो वादनकलेत निपुण असून प्रबळ व युद्धकुशल वीर आहे, तसाच तो चांगला वक्ता असून रूपवान आहे; आणि परमेश्वर त्याच्याबरोबर आहे.”


शौल दाविदाला म्हणाला, “पाहा, माझी वडील कन्या मेरब हिच्याशी तुझे लग्न करून देतो; मात्र तुझा पराक्रम माझ्यासाठी होऊ दे, आणि परमेश्वराच्या वतीने लढाया कर.” आपला हात त्याच्यावर पडू नये तर पलिष्ट्यांचा हात त्याच्यावर पडावा असे त्याला वाटत होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan