Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 पुढे दावीद बहूरीमला आला. तेव्हा शौलाच्या घराण्यातील एकजण बाहेर आला. हा गेराचा मुलगा शिमी होता. तो दावीदाला शिव्याशाप देत चालला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 दावीद राजा बहूरीमजवळ पोहोचताच, एक मनुष्य बाहेर आला, जो शौलाच्या घराण्यातील एका कुळातील होता. त्याचे नाव शिमी होते, तो गेराचा पुत्र होता, तो बाहेर येताच शाप देऊ लागला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:5
22 Iomraidhean Croise  

राजा आपल्या बरोबरच्या लोकांसह आपल्या मुक्कामी थकून-भागून पोहचला. तेथे त्याने विसावा घेतला.


राजा सीबाला म्हणाला, “मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.” सीबाने म्हटले, “मी प्रणाम करतो; माझे स्वामीराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी असावी.”


तो दाविदावर व सर्व राजसेवकांवर दगड फेकू लागला; सर्व लोक आणि लढवय्ये त्याच्या उजव्याडाव्या बाजूंना होते.


पण एका पोराने त्यांना पाहून अबशालोमाला जाऊन सांगितले; तेव्हा ते त्वरेने निघून बहूरीमातील एका मनुष्याच्या घरी गेले; त्याच्या चौकात एक विहीर होती तिच्यात ते उतरले.


अबी-अलबोन, अर्वाथी, अजमावेथ बरहूमी,


तिचा नवरा तिच्याबरोबर गेला; तो बहूरीमापर्यंत तिच्यामागून रडत गेला. तेव्हा अबनेर त्याला म्हणाला, “परत जा;” मग तो माघारी गेला.


शूशन राजवाड्यात मर्दखय बिन याईर बिन शिमई बिन कीश ह्या नावाचा एक बन्यामिनी यहूदी होता;


कारण देवाने माझ्या आयुष्याची दोरी ढिली करून मला दु:ख दिले आहे; म्हणून ते माझ्यासमोर आपल्या तोंडाचा लगाम झुगारून देतात.


माझे वैरी दिवसभर माझी निंदा करतात; माझ्यावर खवळलेले लोक माझ्यावरून शाप देतात.


ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस; ते उठतील तेव्हा लज्जित होतील, परंतु तुझा सेवक हर्षित होईल.


कारण ज्याला तू शिक्षा केलीस त्याच्या पाठीस ते लागतात; तू ज्यांना घायाळ केले आहेस त्यांच्या दु:खात ते भर घालतात.


कारण त्याच्याजवळ ते एकच पांघरूण असून त्याचे अंग झाकायला तेवढेच असणार; ते घेतले तर तो काय पांघरून निजेल? त्याने माझ्याकडे गार्‍हाणे केले तर मी त्याचे ऐकेन, कारण मी करुणामय आहे.


तू देवाला1 दूषण लावू नकोस. आपल्या राज्यकर्त्याला शिव्याशाप देऊ नकोस.


भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही.


तू आपल्या मनातही राजाला शाप देऊ नकोस; आपल्या निजायच्या खोलीतसुद्धा श्रीमंताना शिव्याशाप देऊ नकोस; कारण अंतराळातले पाखरू तुझे शब्द घेऊन उडून जाईल; पक्षी तुझी गोष्ट प्रकट करील.


ते कष्टी व क्षुधित होऊन देशात भटकतील; आणि असे होईल की त्यांना भूक लागली म्हणजे ते संतापून आपल्या राजाला व आपल्या देवाला शिव्याशाप देतील; मग आपली तोंडे ते वर करतील;


तो पलिष्टी दाविदाला म्हणाला, “मी काय कुत्रा आहे म्हणून तू काठी घेऊन माझ्यापुढे आला आहेस?” त्या पलिष्ट्याने आपल्या देवांची नावे घेऊन दाविदाला शिव्याशाप दिले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan