Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 राजा सीबाला म्हणाला, “मफीबोशेथाचे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे.” सीबाने म्हटले, “मी प्रणाम करतो; माझे स्वामीराज, माझ्यावर आपली कृपादृष्टी असावी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला ठीक आहे, जे जे मफीबोशेथच्या मालकीचे होते ते मी आता तुला देत आहे. सीबा म्हणाला, मी आपल्याला नमन करतो. मी तुम्हास आनंद देण्यास समर्थ होईन अशी मी आशा करतो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 तेव्हा राजा सीबाला म्हणाला, “मेफीबोशेथच्या मालकीचे जे सर्व आहे ते आता तुझे आहे.” सीबा म्हणाला, “मी विनम्र अभिवादन करतो, माझ्या स्वामीची माझ्यावर कृपादृष्टी असो.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:4
14 Iomraidhean Croise  

तेव्हा यवाबाने साष्टांग दंडवत घालून राजाला आशीर्वाद दिला आणि म्हटले, “माझे स्वामीराज, आपली कृपादृष्टी माझ्यावर आहे हे आज आपल्या दासाला कळले आहे, कारण महाराजांनी आपल्या दासाच्या विनंतीप्रमाणे केले आहे.”


तकोवा येथील त्या स्त्रीने राजाकडे जाऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि म्हटले, “महाराज, माझी दाद लावा.”


राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तू आपल्या घरी जा, मी तुझ्यासंबंधाने ताकीद देईन.”


राजाने पुन्हा विचारले, “तुझ्या धन्याचा पुत्र कोठे आहे?” सीबा राजाला म्हणाला, “पाहा, तो यरुशलेमेत राहिला आहे, आज इस्राएल घराणे त्याला आपल्या पित्याचे राज्य पुन्हा देईल असे त्याला वाटत आहे.”


दावीद राजा बहूरीम येथे पोहचला तेव्हा पाहा, शौलाच्या घराण्यातील एका कुळातला एक मनुष्य आला; त्याचे नाव शिमी बिन गेरा असे होते; तो शिव्याशाप देत आला.


माझ्या सेवकाने स्वामीराजांकडे माझी चहाडी केली आहे; पण माझे स्वामीराज देवदूतासारखे आहेत; आता आपल्या मर्जीस येईल तसे करा.


मफीबोशेथ बिन योनाथान बिन शौल ह्याने येऊन दाविदाला भूमीपर्यंत लवून दंडवत घातले. दावीद म्हणाला, “मफीबोशेथा!” तो म्हणाला, “आपला दास हजर आहे.”


मग राजाने शौलाचा सेवक सीबा ह्याला बोलावून सांगितले, “जे काही शौलाचे व त्याच्या घराण्याचे होते ते सर्व मी तुझ्या धन्याच्या पुत्राला देतो.


लाच घेऊ नकोस, कारण लाच डोळसांना आंधळे करते, आणि नीतिमानांच्या म्हणण्याचा विपर्यास करते.


ऐकून घेण्यापूर्वी जो उत्तर देतो त्याचे ते करणे मूर्खपणाचे व लज्जास्पद ठरते.


जो आपला दावा प्रथम मांडतो त्याचा पक्ष खरा भासतो, पण त्याचा शेजारी येऊन त्याला कसाला लावतो.


आत्मा ज्ञानहीन असणे बरे नाही; उतावळ्या पायाचा मनुष्य वाट चुकतो.


एखाद्याने काही गुन्हा किंवा अन्याय केला आणि त्याने केलेल्या त्या अपराधाबद्दल त्याच्याविरुद्ध एकच साक्षीदार पुढे आला तर चालणार नाही; दोघा किंवा तिघा साक्षीदारांच्या साक्षीनेच कोणताही आरोप शाबीत व्हावा.


Lean sinn:

Sanasan


Sanasan