Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

22 अबशालोमासाठी राजमंदिराच्या धाब्यावर एक तंबू दिला आणि सर्व इस्राएलांदेखत अबशालोम आपल्या पित्याच्या उपपत्नींपाशी गेला.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

22 मग सर्वांनी राजवाड्याच्या धाब्यावर अबशालोमसाठी राहुटी ठोकली. अबशालोमने आपल्या वडीलांच्या उपपत्नीशी लैंगिक सबंध ठेवले. ही गोष्ट सर्व इस्राएलांनी पाहिली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

22 तेव्हा त्यांनी अबशालोमसाठी छतावर एक तंबू उभारला आणि तो सर्व इस्राएलच्या लोकांच्या नजरेपुढे त्याच्या पित्याच्या उपपत्नींपाशी जाऊन निजला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:22
11 Iomraidhean Croise  

इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


संध्याकाळच्या वेळी दावीद पलंगावरून उठून राज-मंदिराच्या गच्चीवर जाऊन फिरू लागला; तेव्हा एक स्त्री स्नान करताना त्याने तेथून पाहिली; ती स्त्री दिसायला फार सुंदर होती.


मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.


दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या दहा उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या त्यांना त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली; पण त्याने त्यांच्याशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्यदशेत तशाच अटकेत राहिल्या.


त्यांची मुद्रा त्यांच्याविरुद्ध साक्ष देते; ते सदोमाप्रमाणे आपले पाप जाहीर करतात, लपवत नाहीत; त्यांच्या जीविताला धिक्कार असो; ते स्वतःचे वाईट करून घेतात.


ह्यामुळे पर्जन्यवृष्टी आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही.


त्यांनी अमंगळ कृत्य केले त्याची त्यांना लाज वाटली काय? नाही; त्यांना बिलकूल लाज वाटली नाही; शरम कसली ती त्यांना ठाऊक नाही; म्हणून पतन पावणार्‍यांबरोबर ते पतन पावतील; मी त्यांचा समाचार घेईन तेव्हा ते ठोकर खाऊन पडतील, असे परमेश्वर म्हणतो.


कारण तिने रक्तपात केला आहे, त्या रक्ताने ती भरली आहे, ते तिने उघड्या खडकावर पडू दिले आहे; धुळीने ते झाकू नये म्हणून तिने ते जमिनीवर पडू दिले नाही.


त्या वेळेस मोशेसमोर व दर्शनमंडपाच्या दाराशी इस्राएलची सर्व मंडळी जमून रडत असताना एका इस्राएली पुरुषाने एक मिद्यानी बाई त्यांच्यासमक्ष आपल्या भाऊबंदांकडे आणली.


नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, आणि निर्लज्जपणा हे त्यांचे भूषण आहे; त्यांचे चित्त ऐहिक गोष्टींत असते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan