Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

21 अहीथोफेलाने अबशालोमाला म्हटले, “ज्या उपपत्नी तुझा पिता मंदिराच्या रक्षणास ठेवून गेला आहे त्यांच्यापाशी जा; तुझ्या बापाला तुझा वीट आला असे सर्व इस्राएल लोक ऐकतील तेव्हा तुझ्याबरोबरच्या सर्वांच्या हातांना जोर येईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

21 अहिथोफेल त्यास म्हणाला, मंदीराची राखण करायला तुझ्या वडीलांनी त्यांच्या उपपत्नी येथेच ठेवल्या आहेत. त्यांच्याशी तू संबंध ठेव मग तुझ्या वडीलांना तुझा तिरस्कार वाटेल व ही गोष्ट सर्व इस्राएलांमध्ये पसरेल. त्यामुळे त्या सर्वांचा तुला पाठिंबा मिळेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

21 अहीथोफेलने अबशालोमास सल्ला दिला, “तुझ्या पित्याच्या उपपत्नी, ज्यांना तो राजवाड्याच्या देखरेखीसाठी सोडून गेला त्यांच्यापाशी जाऊन नीज. तेव्हा सर्व इस्राएलास समजेल की तू तुझ्या पित्याची किती घृणा करतो आणि तुझ्याबरोबर काम करीत असलेल्या प्रत्येकाचा हात बळकट होईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:21
22 Iomraidhean Croise  

तेव्हा शिमोन व लेवी ह्यांना याकोब म्हणाला, “ह्या देशाचे रहिवासी कनानी व परिज्जी ह्यांना माझा वीट येईल असे करून तुम्ही मला संकटात घातले आहे; माझे लोक मूठभर आहेत, म्हणून ते एकजूट करून माझ्यावर येतील व माझी कत्तल करतील, आणि माझा व माझ्या घराण्याचा फडशा उडवतील.”


इस्राएल त्या प्रदेशात राहत असता रऊबेन हा आपल्या बापाची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी जाऊन निजला, हे इस्राएलाच्या कानावर गेले. याकोबाला बारा मुलगे होते.


तेव्हा ती आपली सून आहे हे न कळून तो वाटेवरून तिच्याकडे वळून म्हणाला, “चल, मला तुझ्यापाशी येऊ दे.” तेव्हा ती म्हणाली, “माझ्यापाशी आलास तर मला काय देशील?”


त्या काळी भूतलावर महाकाय1 होते; पुढे देवपुत्र मानवकन्यांपाशी गेले तेव्हा त्यांना पुत्र झाले. ते प्राचीन काळचे महावीर असून नामांकित पुरुष होऊन गेले.


दाविदाला आपली किळस आली आहे असे अम्मोनी लोकांनी पाहिले तेव्हा त्यांनी बेथ-रहोब येथले अरामी व सोबा येथले अरामी मिळून वीस हजार पायदळ, माका राजाचे एक हजार शिपाई व तोबाचे बारा हजार शिपाई मोल देऊन बोलावले.


परमेश्वर म्हणतो, पाहा, मी तुझ्याच घरातून तुझ्यावर अरिष्ट उभे करीन; तुझ्या स्त्रिया तुझ्यादेखत तुझ्या शेजार्‍याला देईन; तो ह्या सूर्यादेखत त्यांची अब्रू घेईल.


योनादाब त्याला म्हणाला, “तू आपल्या पलंगावर निजून आजार्‍याचे मिष कर, व तुझा पिता तुझा समाचार घेण्यास आला म्हणजे तू त्याला सांग, कसेही करून माझी बहीण तामार हिने येऊन मला अन्न भरवावे, तिने ते अन्न माझ्यादेखत तयार करावे म्हणजे मी ते प्रत्यक्ष पाहून तिच्या हातून खाईन.”


मग राजा निघून गेला व त्याच्यामागून त्याच्या घरची माणसे गेली. त्याच्या ज्या दहा स्त्रिया उपपत्नी होत्या त्यांना घर सांभाळायला ठेवून तो गेला.


मग अबशालोम अहीथोफेलास म्हणाला, “आता आपण काय करावे ह्याविषयी सल्ला दे.”


हूशय अबशालोमाला म्हणाला, “अहीथोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही.”


हिंमत धरा, शूर व्हा; तुमचा स्वामी शौल मृत्यू पावला आहे आणि यहूदाच्या घराण्याने मला अभिषेक करून आपल्यावर राजा नेमले आहे.” दावीद शौलाच्या वंशजांबरोबर लढतो


दावीद यरुशलेम येथे आपल्या मंदिरात आला आणि ज्या दहा उपपत्नी राजमंदिराच्या संरक्षणासाठी त्याने ठेवल्या होत्या त्यांना त्याने अटकेत ठेवून त्यांच्या उदरनिर्वाहाची तरतूद केली; पण त्याने त्यांच्याशी समागम केला नाही. त्या आमरण वैधव्यदशेत तशाच अटकेत राहिल्या.


हदादानेच केवळ इस्राएलास उपद्रव दिला नाही तर रजोनानेही शलमोनाच्या सगळ्या हयातीत इस्राएलाशी वैर केले; आणि त्याने इस्राएलाचा तिटकारा केला व अरामावर राज्य केले.


तो म्हणाला, “शलमोन राजा तुला नाही म्हणणार नाही; त्याला सांग की मला शुनेमकरीण अबीशग बायको करून दे.”


शलमोन राजाने आपल्या आईस उत्तर दिले, “अदोनीयासाठी तू शुनेमकरीण अबीशग हीच तेवढी का मागतेस! तो माझा वडील बंधू आहे त्या अर्थी त्याच्यासाठी किंबहुना अब्याथार याजक व सरूवेचा पुत्र यवाब ह्यांच्यासाठी राज्यदेखील माग.”


आपल्या सावत्र आईची कायाही उघडी करू नकोस, ती तुझ्या बापाचीच काया होय.


जो आपल्या पित्याच्या बायकोशी गमन करतो तो आपल्या पित्याची काया उघडी करतो; त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.


हे यहूदाच्या घराण्या व इस्राएलाच्या घराण्या, असे होईल की, जे तुम्ही राष्ट्रांत शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वादरूप व्हाल; भिऊ नका, तुमचे हात दृढ होवोत.”


मला अशी खबर मिळाली आहे की, तुमच्यामध्ये प्रत्यक्ष जारकर्म चालू आहे आणि असले जारकर्म की जे परराष्ट्रीयांमध्येदेखील आढळत नाही; म्हणजे तुमच्यातील कोणीएकाने आपल्या बापाची बायको ठेवली आहे.


शौलाने पलिष्ट्यांच्या ठाण्यावर मारा केला आणि पलिष्टी लोकांना इस्राएलाचा वीट आला, हे सर्व इस्राएलाच्या कानी गेले. हे ऐकून लोक शौलाजवळ गिलगालात जमा झाले.


आखीशाने दाविदाच्या बोलण्यावर भरवसा ठेवून म्हटले, “ह्याने इस्राएल लोकांना आपला अगदी वीट येईलसे केले आहे; तर आता हा निरंतर आपला दास होऊन राहील.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan