Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 राजाने सिबाला विचारले, “ह्याचे प्रयोजन काय?” सीबा म्हणाला, “गाढव हे राजघराण्यातल्या लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि अंजीर तरुण चाकरांना खाण्यासाठी, आणि द्राक्षारस रानात थकल्या-भागलेल्यांना पिण्यासाठी आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 राजा दावीदाने “हे सर्व कशासाठी? म्हणून सीबाला विचारले सीबा म्हणाला,” “राजाच्या कुटुंबियांना बसण्यासाठी म्हणून ही गाढवे आहेत, भाकरी आणि फळे नोकरांना खाण्यासाठी आणि वाळवंटात चालून थकलेल्यांसाठी हा द्राक्षरस आहे.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 राजाने सीबाला विचारले, “हे तू का आणले आहेस?” सीबाने उत्तर दिले, “गाढवे राजघराण्यातील लोकांना बसण्यासाठी, भाकरी आणि फळे लोकांना खाण्यासाठी आणि हा द्राक्षारस रानातून जाताना जे कोणी थकून जातात त्यांना ताजेतवाने करण्यासाठी.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:2
13 Iomraidhean Croise  

तेव्हा अबीमलेख अब्राहामास म्हणाला, “तुम्ही ही सात कोकरे वेगळी काढून ठेवली ती कशाला?”


मग त्याने म्हटले, “मला तुझा हा सर्व तांडा भेटला तो कशाला?” तो म्हणाला, “माझ्या स्वामीची कृपादृष्टी व्हावी म्हणून.”


ह्यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्यापुढे दौडण्यासाठी पन्नास माणसे ठेवली.


सर्व देशाने मोठा आकांत केला आणि सर्व लोक पार गेले; राजा किद्रोन ओहळापलीकडे गेला; सर्व लोकही पार उतरून गेले; ते रानाच्या वाटेने गेले.


मध, लोणी, मेंढरे व गाईच्या दुधाचा खवा आणला; हे लोक रानात असून भुकेले, तान्हेले व थकलेले असतील असे त्यांना वाटले.


तो म्हणाला, “माझे स्वामीराज, माझ्या सेवकाने मला फसवले; आपला दास पंगू आहे म्हणून आपल्या दासाने विचार केला की, मी आपल्या गाढवावर खोगीर घालून त्यावर स्वार होऊन महाराजांकडे जावे.


मग ‘ह्या ढलप्यांचा अर्थ काय हे आम्हांला तू सांगशील ना,’ असे तुझे बांधव तुला म्हणतील;


त्याला तीस मुलगे होते, ते तीस गाढवांवर स्वारी करत; गिलाद प्रांतात त्यांची तीस नगरे असून त्यांना आजपर्यंत हव्वोथ-याईर म्हणतात.


शुभ्र गर्दभांवर स्वारी करणार्‍यांनो, अमूल्य गालिच्यांवर बसणार्‍यांनो, वाटेने चालणार्‍यांनो, ह्याचे गुणगान करा.


एका मनुष्याने त्याला म्हटले, “तुमच्या बापाने लोकांना शपथ घालून बजावून सांगितले आहे की, आज जो कोणी मनुष्य काही अन्न खाईल त्याला शाप लागो.” लोक तर व्याकूळ झाले होते.


मी आपल्या दासीने आपल्या स्वामींकडे जी ही भेट आणली आहे ती माझ्या स्वामींबरोबरच्या तरुणांना द्यावी.


Lean sinn:

Sanasan


Sanasan