Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 दाविदाचा मित्र हूशय अर्की अबशालोमाकडे गेला तेव्हा त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! चिरायू होवो!”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 दावीदाचा मित्र अर्की हूशय अबशालोमकडे आला आणि त्याने अबशालोमची स्तुती केली. तो म्हणाला, राजा चिरायु होवो, राजा चिरायु होवो.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 तेव्हा दावीदाचा मित्र हूशाई अर्की अबशालोमकडे गेला व त्याला म्हणाला, “राजा चिरायू होवो! राजा चिरायू होवो!”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:16
13 Iomraidhean Croise  

डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.


तर तू नगरात परत जाऊन अबशालोमाला म्हण, ‘महाराज, मी आपला दास होतो; पूर्वी जशी मी आपल्या पित्याची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करतो;’ असे केल्याने तू माझ्यासाठी अहीथोफेलाची मसलत निष्फळ करशील.


तेव्हा दाविदाचा मित्र हूशय नगरात गेला; अबशालोमही यरुशलेमेत दाखल झाला.


पाहा, आज त्याने खाली जाऊन पुष्कळ बैल, पुष्ट पशू व मेंढे ह्यांचा यज्ञ केला असून सर्व राजकुमार, सेनेचे सरदार व अब्याथार याजक ह्यांनाही आमंत्रण केले; ते आमच्यासमोर खाऊनपिऊन म्हणत आहेत, अदोनीया राजा चिरायू होवो!


तेथे सादोक याजक व नाथान संदेष्टा ह्यांनी त्याला अभिषेक करून इस्राएलावर राजा नेमावे, आणि कर्णा वाजवून, शलमोन राजा चिरायू होवो असे पुकारावे.


नाथानाचा पुत्र अजर्‍या कमावीसदारांवर (कारभारी) होता; नाथानाचा पुत्र जाबूद हा प्रधान व राजमित्र होता;


मग त्याने राजकुमाराला बाहेर आणले, त्याच्या शिरावर मुकुट ठेवून त्याच्या हातात आज्ञापट दिला; मग त्यांनी त्याला अभिषेक करून राजा केले व टाळ्यांचा गजर करून म्हटले, “राजा चिरायू होवो.”


ते खास्दी लोक राजाला अरामी भाषेत म्हणाले, “महाराज, चिरायू असा; आपले स्वप्न ह्या दासांना सांगा, म्हणजे आम्ही त्याचा अर्थ सांगू.”


राजा व त्याचे सरदार ह्यांचे शब्द ऐकून राणी भोजनगृहात आली. ती म्हणाली, “महाराज, चिरायू असा; आपल्या मनाची तळमळ होऊ देऊ नका; आपण आपली मुद्रा पालटू देऊ नका.


दानीएल राजाला म्हणाला, “महाराज, चिरायू असा.


मग हे अध्यक्ष व प्रांताधिकारी राजाकडे जमावाने आले व त्याला म्हणाले, “दारयावेश महाराज, चिरायू असा.


आणि पुढे चालणारे व मागे चालणारे लोक गजर करत राहिले की, ‘दाविदाच्या पुत्राला होसान्ना!’ ‘परमेश्वराच्या नावाने येणारा तो धन्यवादित!’ ‘ऊर्ध्वलोकी होसान्ना!’


मग शमुवेल लोकांना म्हणाला, “परमेश्वराने ज्याला निवडले त्याला तुम्ही पाहत आहात ना? सर्व लोकांमध्ये त्याच्या बरोबरीचा कोणी नाही.” तेव्हा सर्व लोकांनी म्हटले, “राजा चिरायू होवो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan