Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 मला होत असलेला उपद्रव कदाचित परमेश्वर पाहील आणि ह्या शिव्याशापाऐवजी मला चांगला मोबदला देईल.”

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 माझ्याबाबतीत घडणारे हे अन्याय कदाचित् परमेश्वर पाहील, आणि शिमीच्या या शिव्याशापाच्या बदल्यात उद्या तो माझे भलेच करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 मला होत असलेल्या त्रासाकडे कदाचित याहवेह पाहतील आणि या शापाऐवजी मी गमावलेला त्यांच्या कराराचा आशीर्वाद मला मिळवून देतील.”

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:12
22 Iomraidhean Croise  

दावीद आपल्या लोकांसह पुढे मार्गस्थ झाला आणि शिमी समोरच्या पहाडाच्या कडेने त्याला शिव्याशाप देत, दगड मारत व त्याच्यावर धूळ उधळत चालला.


जिवंत देवाचा उपमर्द करण्यासाठी अश्शूराच्या राजाने रब-शाके ह्याच्याबरोबर जो निरोप पाठवला त्याचे शब्द आपला देव परमेश्वर कदाचित ऐकेल, व आपला देव परमेश्वर ते शब्द ऐकून त्याला शिक्षा करील, म्हणून जे काही शेष उरले आहे त्यासाठी आपण रदबदली करा.”


तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस; ते उठतील तेव्हा लज्जित होतील, परंतु तुझा सेवक हर्षित होईल.


हे परमेश्वरा, दाविदाप्रीत्यर्थ त्याच्या सर्व कष्टांचे स्मरण कर.


माझी दैन्यावस्था व माझे कष्ट पाहा; माझ्या सर्व पापांची क्षमा कर.


असे केल्याने त्याच्या मस्तकावर तू निखार्‍यांची रास केल्यासारखे त्याला होईल. आणि परमेश्वर तुला प्रतिफळ देईल.


भ्रमण करणारी चिमणी व उडणारी निळवी ह्यांच्याप्रमाणे निष्कारण दिलेला शाप कोठेच ठरत नाही.


त्याने जसे दुसर्‍यांना मारले तसे देवाने त्याला मारले काय? जसे मारेकर्‍याने इतरांना मारले तसे त्याला मारण्यात आले काय?


परमेश्वर तुमचा देव ह्याला कळवळा येऊन तो मागे वळेल व आपल्यामागे आशीर्वाद ठेवून जाईल की नाही कोण जाणे; असे की जेणेकरून तुम्हांला त्याला अन्नार्पण व पेयार्पण करता येईल.


परंतु आपल्याला ठाऊक आहे की, देवावर प्रीती करणार्‍यांना म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावलेल्यांना देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.


कारण आमच्यावर येणारे तात्कालिक व हलके संकट हे आमच्यासाठी अत्यंत मोठ्या प्रमाणात सार्वकालिक गौरवाचा भार उत्पन्न करते;


तरी तुझा देव परमेश्वर हा बलामाचे ऐकायला तयार झाला नाही; उलट तुझा देव परमेश्वर ह्याने तुझ्याकरता त्या शापाचा आशीर्वादच केला, कारण तुझा देव परमेश्वर ह्याची तुझ्यावर प्रीती होती.


तू आपल्या हयातीत त्याचे क्षेमकुशल कधीही चिंतू नकोस.


म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल;


त्यांना योग्य वाटली तशी थोडे दिवस ते शिक्षा करत होते; पण तो करतो ती आपल्या हितासाठी, म्हणजे आपण त्याच्या पवित्रतेचे वाटेकरी व्हावे म्हणून करतो.


ती म्हणाली, “हे सेनाधीश परमेश्वरा, तू आपल्या ह्या दासीच्या दुःखाकडे खरोखर अवलोकन करशील, माझी आठवण करशील, आपल्या दासीला विसरणार नाहीस,आपल्या दासीला पुत्रसंतान देशील, तर त्याच्या आयुष्यभरासाठी मी त्याला परमेश्वराला समर्पित करीन; आणि त्याच्या डोक्यावर वस्तरा फिरवणार नाही;” असा तिने नवस केला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan