Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग दाविदाने अबीशय व आपले सर्व सेवक ह्यांना सांगितले, “पाहा, प्रत्यक्ष माझा पुत्र, माझ्या पोटचा गोळा, माझा जीव घ्यायला पाहत आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे ह्यात काय नवल! त्याच्या वाटेला जाऊ नका, त्याला शिव्याशाप देऊ द्या! कारण परमेश्वरानेच त्याला सांगितले असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 अबीशयला आणि इतर सर्व सेवकांना राजा पुढे म्हणाला, माझा पोटचा मुलगा अबशालोमच माझ्या जिवावर उठला आहे, तर हा बन्यामिनी हे असे करत आहे तर त्यामध्ये नवल काय. त्यास हवे ते म्हणू द्या, कारण परमेश्वरानेच त्यास सांगितले असेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 तेव्हा दावीद अबीशाई व त्याच्या सर्व अधिकार्‍यांना म्हणाला, “माझा पुत्र, माझे स्वतःचे रक्त-मांस मला मारून टाकण्याचा प्रयत्न करीत आहे, तर हा बिन्यामीन किती अधिक करेल! त्याला जाऊ द्या; व शाप देऊ द्या, कारण याहवेहने त्याला तसे करण्यास सांगितले आहे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:11
14 Iomraidhean Croise  

तेव्हा परमेश्वराचे वचन त्याला प्राप्त झाले की, “हा मनुष्य तुझा वारस होणार नाही, तर तुझ्या पोटचाच तुझा वारस होईल.”


तुम्ही मला ह्या देशात विकून टाकले ह्याबद्दल आता काही दु:ख करू नका; आणि संताप करून घेऊ नका, कारण तुमचे प्राण वाचवावे म्हणून देवाने मला तुमच्यापुढे पाठवले.


बन्यामिनी बिक्रीचा पुत्र शबा हा एक अधम मनुष्य होता; त्याने रणशिंग फुंकून म्हटले, “दाविदाकडे आमचा काही विभाग नाही; इशायपुत्राकडे आमचा काही वतनभाग नाही; इस्राएलहो, आपापल्या डेर्‍यांची वाट धरा.”


तेव्हा राजा नाथान संदेष्ट्याला म्हणाला, “पाहा, मी गंधसरूच्या मंदिरात राहत आहे, पण देवाचा कोश कनाथीच्या आत राहत आहे!”


तेथे तो आपला देव निस्रोख ह्याच्या देवळात जाऊन पूजा करत असता त्याचे मुलगे अद्रम्मेलेक व शरेसर ह्यांनी त्याचा तलवारीने वध केला आणि ते अराराट देशात पळून गेले; मग एसर-हद्दोन त्याच्या जागी राजा झाला.


मग परमेश्वराने एक दूत पाठवला. त्याने अश्शूरच्या राजाच्या छावणीतील सर्व शूर वीर, प्रमुख व नायक ह्यांची कत्तल केली; तेव्हा तो फजीत होऊन आपल्या देशास परत गेला. तो आपल्या दैवतांच्या देवळात असता त्याच्या पोटच्याच मुलांनी त्याला तलवारीने मारून टाकले.


ते शाप देतात पण तू आशीर्वाद देतोस; ते उठतील तेव्हा लज्जित होतील, परंतु तुझा सेवक हर्षित होईल.


जर कोणी संदेष्टा भ्रमात पडून संदेश देत असला तर समजावे की मीच त्याला भ्रमात पाडले आहे; मी आपला हात त्याच्यावर उगारीन व माझे लोक जे इस्राएल त्यांतून त्याचा उच्छेद करीन.


तेव्हा जे चांगले नाहीत असे नियम मी त्यांना दिले, ज्यांनी ते जगायचे नाहीत असे निर्णय त्यांना दिले.


भाऊ भावाला व बाप मुलाला जिवे मारण्यासाठी धरून देईल, ‘मुले आईबापांवर उठून’ त्यांना ठार करतील;


आता माझे स्वामीराज ह्यांनी आपल्या दासाची विनंती ऐकावी; परमेश्वराने जर आपणाला माझ्याविरुद्ध चेतवले असेल तर तो हे माझे अर्पण मान्य करो; पण कोणी मानवांनी आपणाला चेतवले असेल तर परमेश्वराच्या दृष्टीने ते शापित होवोत, कारण मी परमेश्वराच्या वतनाचा वाटेकरी होऊ नये म्हणून त्यांनी मला बाहेर हाकून दिले आहे; ते म्हणतात, जा, अन्य देवतांची उपासना कर.


Lean sinn:

Sanasan


Sanasan