Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




२ शमुवेल 16:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 दावीद डोंगराच्या माथ्यावरून पलीकडे गेला तेव्हा त्याला मफीबोशेथाचा चाकर सीबा हा भेटला; खोगीर घातलेली दोन गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, खिसमिसांचे शंभर घड, अंजिराच्या शंभर ढेपा व द्राक्षारसाचा एक बुधला अशी सामग्री त्याच्याजवळ होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 डोंगरमाथ्याच्या थोडे पुढे गेल्यावर, मफीबोशेथाचा सेवक सीबा दावीदाला भेटला. सीबाजवळ खोगीर घातलेली दोन गाढवे होती दोनशे भाकरी, किसमिसाचे शंभर घड, अंजिरांच्या शंभर ढेपा आणि द्राक्षरसाचा बुधला एवढे सामान गाढवांवर लादलेले होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 जेव्हा दावीद डोंगराच्या माथ्यावर काही अंतरावर गेला, तिथे मेफीबोशेथचा कारभारी सीबा त्याला भेटण्यासाठी तिथे वाट पाहत होता. त्याच्याकडे खोगीर घातलेली गाढवे व त्यांच्यावर दोनशे भाकरी, मनुक्यांच्या शंभर ढेपा, अंजिराच्या शंभर ढेपा आणि द्राक्षारसाचा एक बुधला होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




२ शमुवेल 16:1
17 Iomraidhean Croise  

दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला; तो रडत रडत वर चढून गेला; आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला; त्याच्याबरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली.


डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहचला, तेव्हा हूशय अर्की त्याला भेटायला आला; त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती.


त्याच्याबरोबर एक हजार बन्यामिनी पुरुष होते; त्याप्रमाणेच शौलाच्या घराण्यातला सेवक सीबा हा आपले पंधरा पुत्र व वीस चाकर ह्यांना घेऊन तेथे आला; ते राजापुढे यार्देनेच्या पलीकडे पायी गेले.


बर्जिल्लय फार वयातीत होता; त्याचे वय ऐंशी वर्षांचे होते. राजा महनाईम येथे तळ देऊन राहिला होता तेव्हा बर्जिल्लयाने त्याला अन्नपाणी पुरवले होते; तो फार मोठा मनुष्य होता.


ह्याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली ह्या प्रांतांपर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल आदिकरून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल ह्यांवर लादून आणल्या; त्याप्रमाणेच त्यांनी बैल व शेरडेमेंढरे पुष्कळ आणली, कारण इस्राएलात उत्सव चालला होता.


लाच मनुष्याचा मार्ग मोकळा करते, व त्याला बड्या लोकांसमोर नेते.


पाहा, मी तर जे खास्दी आपल्याकडे येतील त्यांच्या तैनातीसाठी मिस्पा येथे राहतो; पण तुम्ही द्राक्षारस, ग्रीष्म ऋतूतील फळे व तेल ह्यांचा संचय करून आपल्या भांड्यांत भरून ठेवा व तुम्ही ताब्यात घेतलेल्या नगरात राहा.”


तेव्हा ज्या ज्या ठिकाणी त्यांना हाकून दिले होते तेथून सर्व यहूदी परत यहूदा देशात मिस्पा येथे गदल्याकडे आले व त्यांनी द्राक्षारस व ग्रीष्म ऋतूतील फळे ह्यांचा मोठा संचय केला.


प्रभू परमेश्वराने मला दाखवले तेव्हा पाहा, मला पक्‍व फळांची पाटी दिसली.


कोण ही माझी विपत्ती! उन्हाळ्यातील फळे काढून घेतल्यावर जशी झाडावर काही राहतात, द्राक्षीच्या वेलीवर जसा सरवा राहतो, तसा मी झालो आहे; खायला द्राक्षांचा एक घोसही राहिला नाही; माझ्या जिवाला आवडेल असा पहिल्या बाराचा अंजीर राहिला नाही.


मग तेथून पुढे जाताना ताबोरचा एला वृक्ष तुला लागेल, तेथे तीन माणसे बेथेल येथे देवाकडे जाताना तुला आढळतील, त्यांतल्या एकाच्या हातात तीन करडे, दुसर्‍याच्या हातात तीन भाकरी आणि तिसर्‍याच्या हातात एक द्राक्षारसाचा बुधला असेल.


मग इशायाने भाकरींनी लादलेले एक गाढव, द्राक्षारसाचा एक बुधला व एक करडू घेऊन आपला पुत्र दावीद ह्याच्या हस्ते शौलाकडे पाठवले.


तेव्हा अबीगईल हिने त्वरेने दोनशे भाकरी, द्राक्षारसाचे दोन बुधले, पाच मेंढरांचे रांधलेले मांस, पाच मापे हुरडा, खिसमिसांचे शंभर घड आणि अंजिराच्या दोनशे ढेपा हे सर्व घेऊन गाढवांवर लादले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan